खाली दिलेल्या रिकाम्या जागेत तुमचा ई-मेल ऍड्रेस देऊन subscribe वर क्लिक केल्यास nashikgreps.com वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखांची नोंद तुम्हाला तुमच्या inbox मध्ये मिळेल.
Delivered by FeedBurner

प्रश्न तुमचे उत्तर तज्ञांचे


द्राक्ष बागेत काम करतांना अनेक समस्या येतात.या समस्यांसंदर्भात द्राक्ष बागायतदारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची तज्ञांनी दिलेली उत्तरे......


मातीचे आणि देठाचे पृथ:करण नियमीत करणे गरजेचे आहे काय?
-निदान करणे :अशा पध्दतीचे पृथ:करण वेलीमधील अन्नद्रव्यांचा असमतोलपणा, कमतरता व त्यांचे जास्त प्रमाण (विषमता) तपासण्यासाठी केली जाते.असे पृथ:करण केल्यास वेलीतील प्राकृतिक बिघाड कि,जो उत्पादकता कमी करतात,तो समजण्यासाठी मदत होते.कधी कधी वेलीमधील दोन पेक्षा अधिक मुलद्रव्यांची कमतरता आढळल्यास ती ओळखणे अवघड ज़ाते अशा वेळेस देठाचे पृथ:करण करणे जरुरीचे बनते.भुरी सारख्या रोगाचे लक्षण क़ि ज्यात पानांच्या बाहेरील बाजु आतमध्ये वळतात,पालाश कमतरतेशी मिळती जुळती असतात,द्राक्षबागायतदार अशा स्थितीत गोंधळून जातो.वेलीच्या मुळ्य़ांभोवती पाणी साठून राहिल्यास,तेथील हवा खेळती राहत नाही,आणि त्यात जर क्षारतेची भर पडली तर पाने तशीच लक्षणे दाखवतात. अशा पस्थितीत निरोगी वेल व आजारी वेल बाजुला करुन त्यांचे पृथ:करण केले जाते.त्यांचे नमुने एकत्र करण्यासाठी देखील निरोगी व आजारी वेल निवडली जाते.


निरीक्षण : अशा पध्दतीने पृथ:करण हे वेलीमधील अन्नद्रव्याची योग्य रितीने देखरेख करते. जेणे करुन आपणास परिणामी उत्पादन मिळते.यामुळे वेलींना लागणा-या अन्नद्रव्यांची चालु हंगामात गरज आणि अन्नद्रव्यांनवर निष्फळ खर्च कमी करता येतो. आपण सुक्ष्म घड निर्मीतीच्या वेळेस आणि घडांची फुलोरा अवस्थेत देठ पृथ:करण करण्यास शिफारस करतो,यामुळे वेलीमधील घडांचा दर्जा व उत्पादनासाठी लागणा-या अन्नद्रव्यांची निरीक्षणे करावयाची असल्यास, बागेत विशिष्ठ ठिकाण शोधुन प्रत्येक वेळेस त्याच वेलीवरुन नमुने गोळा करावेत.यामुळे अन्नद्रव्यांचे आणि त्यामुळे वेलीच्या उत्पादकतेचे निरीक्षण करणे देखील सोपे जाते.
मातीचे पृथ:करण हे हंग़ाम सुरु होण्य़ापूर्वी आणि खते देण्याआधी करुन घेणे महत्वाचे आहे, यामुळे जमीनीतील सामु,विद्युत वाहकता आणि विशिष्ठ मुलद्रव्यांचे कमी आधिक प्रमाण ओळखता येते,आणि त्याच प्रमाणात त्यांचे व्यवस्थापन करता येते.वेलीवरील संशोधनाद्वारे आपणाला असे निदर्शनास आले आहे की,वेलीतील गरज आणि जमिनीत असलेल्या अन्नद्रव्यांची मात्रा यांचा परस्पर संबंध हा एक सारखा नाही.म्हणूनच वेलीमधील अन्नद्रव्यांचे निरीक्षण क़ऱण्यासाठी देठ पृथ:करण करणे जरुरीचे आहे.


कलम यशस्वी होण्याकरिता कोणती परीस्थीती असावी?
- कलम यशस्वी होण्याच्या दृष्टीने बागेतील वातावरणात तापमान ३५ अंश से.पर्यंत व आद्रता ८० टक्क्यांच्यापुढे असणे मह्त्वाचे असते.खुंटकाडी ही पुर्ण परिपक्व झालेली नसुन,रसरशीत असल्यास त्या काडीतुन कलमजोडाच्या मध्यमातुन सायन काडीमध्ये रस पुढे जाईल व कॅलस लवकर तयार होण्यास मदत होईल.या गोष्टीसोबत कलम करणा-या कारागीराची कुशलता तेवढीच महत्वाची आहे.


कलम करण्याकरिता सायनकाडी (डोळ ) ही स्वमुळावरील की खुंटावरील वेलीवरुन घ्यावी?
- कलम करण्याकरीता सायनकाडी ही कोणत्याही प्रकारच्या वेलीवरुन घेतल्यास हरकत नाही.या मध्ये काडीची निवड क़ऱताना महत्वाचा मुद्दा हा आहे, की सायनकाडी परीपक्व झालेली असावी.ही काडी खुंटकाडीला मॅच होइल व मजबुत,फुगीर डोळे असलेली असावी.


रुटस्टॉक बागेतील काडया फारच बारीक असल्यास दोन काड्यांना जोडुन कलम करता येईल का?
-बागेत पुर्णपणे कलम यशस्वी होण्याकरीता काडीची जाडीसुध्दा तेवढीच महत्वाची आहे.बागेत एक दोन ट्क्के अशा दामनाच्या जाडीच्या( दोन-तिन एम एम) काड्यांनवर कलम करता येईल.यामधे फक्त प्रयत्न करता येईल.काही कलम यशस्वी होईल किंवा नाही याची जास्त खात्री नसेल.बागेत पुर्ण काड्या अशाच असल्यास शक्यतो कलम करु नये.


मी किती प्रमाणात खते वेलींना देऊ?
-वरती सांगितल्या प्रमाणे, वेलींना तंतोतंत प्रमाणात अन्नद्रव्ये देणे,हे वेलीच्या देठाचे व मातीचे परिक्षण क़ऱूण ठरवता येईल.वेलींना देण्यात येणा-या पाण्याचा दर्जा देखील काही प्रमाणात अन्नद्रव्ये व्यवस्थापनात मोलाचा वाटा निभावू शकतो,कारण बरीचशी मुलद्रव्ये ही पाण्यात असतात.याच्या पलीकडे कोणत्याही प्रकारची खते आपणाला द्यावयाची आहेत हे ठरवण्यासाठी पाण्याचा व मातीचा दर्जा देखील कारणीभूत ठरतो.


खुंटावर रंगीत जातीचे कलम करणे योग्य आहे का?
-बागेत असलेल्या पाण्याच्या व मातीच्या बिकट परिस्थीतीमुळे स्वमुळावरील बागेच्या उत्पादनात घट येत आहे.खुंट रोपांचा वापर सुरु झाल्यापासुन उत्पादनात वाढ झाली व सोबतच चांगल्या प्रतीचे उत्पादन मिळु लागले.तेव्हा ,द्राक्ष जातीचा विचार न करता बागेत असलेल्या अडचणीचा विचार करुन कोणत्या खुंटाचा वापर करता येईल याकडे लक्ष द्यावे.


कलम केल्यानंतर डोळे फुटण्याकरीता किती कालावधी लागतो?
-कलम केल्यानंतर डोळे फुटण्याकरीता बागेतील वातावरण (तापमान व आद्रता) महत्वाचे असते.त्याच सोबत वापरलेली सायन काडी (डोळाची) कशी आहे, त्या काडीवरील डोळा कसा आहे, यावर ब-याच गोष्टी अवलंबुन आसतात.कलम केल्यानंतर काडी फुटायला साधारण बारा ते आठरा दिवसांचा कालावधी लागतो.


जिरणारा घड कसा समजावा?
-तीन-चार पानांच्या अवस्थेत आपल्याला घड बाहेर येतांना दिसतो.अशक्त घडाच्या तळात बाळी दिसेल व घडाचा आकार गोल दिसेल,रंग फिक्कट पिवळसर,असा घड जिरण्याची शक्यता जास्त असते.याच तुलनेत सशक्त अशा घडाचा आकार लाबट असेल व त्याच्या तळात बाळी नसेल.हा जोमदार असा न जिरणाऱा घड असेल.


घड जिरायला लाग़ताच काय करावे?
-फळछाटणी झाल्यानंतर चांगल्या वातावरणात सहा-सात दिवसानंतर डोळे फुटायला सुरुवात होते.बागेत पोंगा अवस्थेत जर वातावरण बिघडले असेल,म्हणजेच पाउस आला असेल,ढगाळी वातावरण असेल किंवा बागेत पाणी साचले असेल,अशा परीस्थीत वेलीमध्ये शरीरशास्रीय हालचालीमध्ये अडथळे येतात.पोंगा अवस्थेतील डोळ्यात सायटोकायीनचे प्रमाण कमी होउन जिबरेलीकचे प्रमाण वाढते,त्यामुळे घड जिरायला लागतो किंवा गोळी घड तयार होतो.अशा परीस्थीत बागेत सीसीसी व ६ बीए यांसारख्या संजिवकांची फवारणी करुन घड जिरण्यापासुन बागेला वाचवता येते.  


फेलफुट क़ाढण्याची योग्य वेळ क़ोणती?
-द्राक्षबागेत तिन ते चार पानांच्या फुटीनिघाल्या की घड दिसायला सुरवात होते.दोन दिवस पुन्हा थांबुन पाच पानांच्या अवस्थेत तो घड (जिरणाऱा क़िवा शसक्त) स्पष्टपणे दिसतो.तेव्हा अशा परीस्थीत फेलफुट काढुन घ्यावी यामुळे काडीतुन वाया जाणारे अन्नद्रव्ये घडाच्या वाढीकरता उपयोगात येईल. ही  फेलफुट काढण्याकरीता उशीर होणार नाही,याची बागायतदारांनी काळजी  घ्य़ावी,कारण या फुटी जेवढ्या कोवळ्या असतात,तेवढय़ाच अन्नद्रव्ये शोषुन घेण्याकरीता सक्षम असतात.     



गडलिंग म्हणजे काय?

गडलिंग म्हणजे काय?
द्राक्षवेलीच्या खोडावरील बाह्य भागास (साल)प्लोएम असे म्हणतात,तर त्याखालील आतील पांढ-या आवरणास  झायलेम असे म्हणतात.झायलेम व प्लोयम या भागांतून जमिनीतून तसेच वरून खाली येत असलेल्या अन्नद्रव्याचा पुरवठा हा खोडावर ठराविक जाडीची खाच करून खंडीत केला जातो.खोडावर दोन मि.मी.खोलीची साल विशिष्ट पात्याच्या (चाकू)साह्याने काढली जाते.याच पद्धतीला गडलिंग असे म्हणतात.
गडलिंग कसे व कधी करावे?
गडलिंग कसे करावे व नेमक्या कोणत्या आवस्थेत करावे,असा प्रश्न अनेकांच्या मनात उभा राहतो.सध्याच्या परीस्थित निर्यात होणारी थॉमसन सीडलेस व तास-अ-गणेशवर केलेल्या गडलिंगचे परिणाम चांगले आढळून येतात;परंतु वेगवेगळ्या द्राक्ष जातीमध्ये गडलिंग केल्यानंतर त्या वेलीचा प्रतिसाद वेगवेगळा असतो.त्यामुळे मण्याच्या वाढीची अवस्था व द्राक्ष जात यामध्ये वेळ साधून केलेले गडलिंग मण्यांची जाडी वाढून देण्यास कारणीभूत ठरते.
  फुलोरा अवस्थेत केलेल्या गडलिंगमुळे शोर्ट बेरीज प्रमाण जास्त वाढण्याची भीती असते,यामुळे गडलिंग थोडी उशीरा करतो; परंतु मण्यांचा आकार (सेटिगनंतर) प्रत्येक दिवशी वाढतांना दिसतो.उशिरा केलेल्या गडलिंगमुळेसुध्दा चांगले परिणाम आढळून येत नाही.अनेक संशोधन केंद्रात झालेल्या संशोधनाच्या अनुमानानुसार स्पष्ट झाले,की थॉमसन सीडलेस या जातीमध्ये पाच ते सात मि.मी.मण्याच्या आकारमानाच्या वेळी गडलिंग केल्यास,घडाचा आकार वाढून घेतल्यास चांगला फायदा झाला,तर हेच गडलिंग शरद सीडलेस या जाती मध्ये (Black) आठ ते दहा मि.मी.मण्यांच्याआकाराच्या वेळी केल्यास मण्यांचा आकार जास्त वाढल्याचे आढळून आले.माझ्या मते द्राक्षवेलीची गडलिंगची वेळ ही छाटणी पासून दिवस मोजून न करता वेगवगळ्या वातावरणात छाटणीपासून गडलिंगची अवस्था येण्याचा कालावधी कमी-अधिक लागतो त्यामुळे मण्यांची अवस्था पाहूनच  गडलिंग केल्यास त्याचे चांगले परिणाम आढळून येतात.मण्यांच्या वाढीच्या या अवस्थेत पेशी विभाजनाचे कार्य जोमात सुरु असते व त्यामुळेच गडलिंगचा परिणाम आढळून येतो.साधारणत: दोन मि.मी जाडीची गोलाकार गडलिंग करून,मण्यांची फुगवण चांगली होते.शक्यतो गडलिंगचा आकार(कमी-जास्त जाडीचे गडलिंग)हा त्या वेळीमध्ये झालेले अन्नद्रव्य ,वेलीचाविस्तार,कार्यक्षम पांढरीमुळी,काडीवर पानांची संख्या इ.गोष्टीवर अवलंबून असतो.कारण गडलिंग करणे म्हणजे वेलीला एक प्रकारची जखम करणे होय.तेव्हा ही जखम शक्य तेवढ्या लवकर भरून येणे सुध्दा तेवढेच गरजेच असते.ही जखम भरून येईपर्यत त्या घडाच्या विकासाकरिता आवश्यक असलेले अन्नद्रव्य वेलीमधून मिळणे महत्वाचे असते.म्हणूनच  गडलिंगची जखम तीन आठवडयापर्यत भरून यावी व घडाच्या विकासामध्ये कुठलेही आडथळे येऊ नयेत याकरिता दोन मि.मी पर्यतचे गडलिंग आपल्या जमिनीत फायद्याचे ठरते असे मानले जाते.
गडलिंग करतांना घ्यावयाची काळजी:

द्राक्ष शेतीतील नवे संकट


 भारतात सन १९६५ च्या आसपास हरीतक्रांती झाली.शेतीचे उत्पादन प्रचंड वाढवुन अन्नधान्य उत्पादनात देश स्वयंपुर्ण झाला.त्यानंतर जवळपास ३० वर्ष शेतीत नवे नवे प्रयोग होउन उत्पादन वाढले.मागील दशकापासुन मात्र शेतीत विशेष परिवर्तन न होता, शेती  उत्पादनात सातत्याने घट येत असल्याचे निदर्शनास  येत आहे. पहिल्या पेक्षा शेतक-यांचा शैक्षणिक दर्जा आता उंचवला आहे.प्रत्येक तंत्रज्ञानाचा वापर आता शेतीत होत आहे.परंतु बदलत्या  वातावरणात व वाढीव तापमानात शेती उत्पादनातील घट ही चिंतेची बाब झाली आहे.
  युरोपीय राष्ट्रांमध्ये शेती तंत्रज्ञान सुक्ष्म पातळीवर पोहचले आहे.तेथील शेतक-यांना प्रत्येक किड-रोगा मागील मुख्य कारण माहित झालेले आहे.व त्या रोगांची आणि किडीची नुकसानीची पातळी देखील अभ्यासली गेली आहे.त्याप्रमाणे भारत मागे असल्याचे निदर्शनात येते.
  भारतात १९७२ मध्ये  सर्वेक्षण झाले त्यात ७०० सुत्रकॄमी विविध पिकांवर आढळले असुन त्यापैकी महाराष्ट्रात ७५ सुत्रकॄमींच्या हानीकारक जाती आढळ्याल्या आहेत.सुत्रकॄमी बदलत्या वातावरणात आक्रमक झाल्यामुळे दिवसेंदिवस द्राक्ष, डाळींब, टोंमॅटो सहित इतर भाजीपाला , फळपिके व तॄणधान्य प्रभावीत होत आहेत.कॄषी उत्पादनातील होत असणारी घट  व  वाढत चाललेली खतांची गरज आणि वाढलेले  किडरोग व पिकांची क़मी  झालेली प्रतिकार क्षमता यामागील नंबर एकचा शत्रु सुत्रकॄमी आसल्याचे लक्षात आले.

घड जिरने म्हणजे काय?

ऑक्टोंबर छाटणीनंतर सुरुवातीला घड पोंग्यात असतांना कमकुवत दिसतात बाग १२ ते १४ दिवसांची असतांना घड बाळी पकडतो आणि शेंडा जोरात चालुन घड १५ ते १६ दिवसांत पांढरा पडून १८ ते २० दिवसांपर्यत संपुर्ण दिसेनासा होतो किंवा गोळी होउन गळुन पडतो.ह्या समस्येस "घड जिरणे" असे म्हणतात.घड संपुर्ण जिरल्यानंतर द्राक्षबाग ही फेल घोषीत होउन द्राक्षबागायतदारांचे १ वर्ष (हंगाम) वाया जाते.
 का जिरतात घड ?
   एप्रिल छाटणीनंतर काडी पक्व होण्याच्या दॄष्टीने कामे करण्याचे सातत्य नसेल आणि काडी पक्व होण्याआगोदर वेलीची पानगळ झाल्यास किंवा ऑक्टोंबर छाटणीनंतर वातावरण चांगले असेल तरी घड जिरतात तसेच सर्व कामे व्यवस्थीत करुन देखील छाटणी छाटणीनंतर आभाळीवातावरण(ढगाळ) आणि पाउस पडल्यास आणि बागेतील पाण्याचा योग्य निचरा न झाल्याने देखील द्राक्षघड जिरतात.आभाळीवातावरण त्यातच जादा पाउस पडून घड जिरतात म्हणजेच घड जिरण्याची समस्या हि द्राक्ष वेलीच्या मुळाशी निगडीत आहे.प्रथम हे लक्षात घेतल्यास आपली द्राक्ष घड वाचवणे सोपे होईल.

Agriculture website


शेतीसाठी उपयुक्त उपउक्त वेब साईट


माहिती तंत्रज्ञान शेतीसाठी उपयुक्त
शेतीमधील नवीन तंत्रज्ञानाबरोबरीने इंटरनेटवर देखील माहितीचा प्रचंड खजिना उपलब्ध आहे. देशातील महत्वाच्या संस्थांच्या वेबसाइटवर( संकेतस्थळ) काय पहाल, त्याबाबतची माहिती व लिंक ......



www.agri.mah.nic.in

महाराष्ट्र शासनाच्या कॄषी विभागाचे हे अधिकॄत संकेत स्थळ आहे.या संकेत स्थळावर कॄषीविभाग, त्यातील नवी भरती,विभागाची कार्यपध्दती आदि माहिती सुरवातीला दिली आहे. तसेच राज्याचा नकाशा दिला आहे. त्यातील प्रत्येक  जिल्हावार माउसने क्लिक केल्यावर त्या त्या जिल्हातील शेती संबंधीची माहिती मिळते.त्या शिवाय बियाने,खते,कीट्कनाशके यांच्या उपलब्धतेची माहीती या संकेत स्थळावर मिळते. विशेष म्हणजे हे संकेत स्थळ मराठी भाषेतही पाहायची सोय आहे. हे संकेत स्थळाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.






www.apeda.com                
’कॄषी व  प्रक्रियायुक्त अन्न निर्यात विकास प्राधिकरण’(अपेडा)यासंस्थेचे हे संकेत स्थळ आहे.यावर संस्थेची माहिती,नोंदणी करण्याची पध्दत,संस्थेची कार्य पध्दती,भारताचे निर्यात विभाग, बासमती निर्यात विकास संस्था,अभ्यास अहवाल, प्रकाशने,अपेडाकडून निर्यात केली जाणारी उत्पादने,त्यांच्या निर्यातीसंब्धीची आकडेवारी ,अर्थसाह्यच्या योजना,लॅब रेकग्निशन सिस्टिम,व्यापारासंदर्भातील माहिती,ट्रेड जक्शन, आंतरराष्ट्रीय किंमती, पीकनिहाय आयातदार, व निर्यातदारांची यादि आदि माहिती या संकेतस्थळवर मिळू शकते. त्याच प्रमाणे काहि आंतरराष्ट्रीय महत्वाच्या घटना , निर्यातीसंबंधी नवे निर्णय तसेच नव्या योजना,इंडीयन अॅतग्री ट्रेड जंक्शन,ग्रेपनेट इत्यादिबद्दलची माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.ही माहिती हिंदीमध्ये पाहाण्याची सोय आहे. या संकेतस्थळाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.




www.nabard.org                
हे संकेतस्थळ राष्ट्रीय कॄषी आणि ग्रामीण विकास बॅन्केचे (नाबार्ड) आहे.बॅन्केची माहीती, तिची विकास कार्ये, मॉडेल प्रकल्प, ग्रामीण अर्थव्यवस्था, नाबार्डचे विभाग, कर्जपुरवठा विषयक माहिती ,नाबार्ड रूरल बॉड्स. न्युजलेटर्स,नोकरीच्या संधी, सध्या चालु असलेली कामे,तसेच ताज्या घडामोडी , टेंडर्स,वार्षिक अहवाल आदिबाबतची सविस्तर माहिती यासंकेत स्थळावर उपलब्ध आहे. या संकेस्थळाला भेट देण्यासाठी येथे  क्लिक करा.
www.msamb.com               महाराष्ट्र राज्य कॄषी विपणन मंडळाचे हे संकेत स्थळ आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्या,शेतीमालाची निर्यात, विविध योजना,नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट हार्वेस्टींग टेक्नॉलॉजी,हॉर्टीकल्चर ट्रेंनिंग सेंटर,शेतीमालाचे ताजे दर, इतर राज्यांतील दराबद्दलची माहिती, व्हेपर हीट ट्रिटमेंटच्या वापरासंबंधी मार्गदर्शन ,महत्वाच्या बातम्या ,कॉन्टटॅक्ट फार्मिग, या संबधीची सर्व माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या संकेतस्थळास भेट देण्यासाठी येथे  क्लिक करा.
---------------------------------------------------------------------------------- 
                           कृषी विद्यापीठांची संकेत स्थळे : 
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कॄषी विद्यापिठ, दापोली :
महात्मा फुले कॄषी विद्यापिठ, राहुरी :
मराठवाडा कॄषी विद्यापिठ, परभणी :
डॉ. पंजाबराव देशमुख कॄषी विद्यापिठ, अकोला :
हि महाराष्ट्रातील कृषी विद्यापिठांची संकेत स्थळे आहेत.या संकेत स्थळावर विद्यापिठांची सविस्तर माहिती उपलब्ध आहे.तसेच विद्यापिठाचे कुलगुरु आणि अन्य आधिकारी,विद्यापिठात झालेले आणि चालु असलेले संशोधन,विद्यापिठाद्वारे विस्तार शिक्षणासाठी घेण्यात येणारे कार्यक्रम ,प्रवेश प्रक्रीया , विक्रीसाठी असलेले रोपे,आणि अन्य उत्पादने ,पीकनिहाय शिफारशी ,विद्यापिठाने प्रसारीत केलेल् पिकाच्या जाती,विकसित केलेले कृषी तंत्रज्ञान आणि कॄषी अवजरे ,विद्यापिठाचे ग्रंथालय , या विषयीची माहिती या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.

मालकडी तयार करतांना


नविन कलम केलेली द्राक्षबाग फेब्रुवारी महिन्यात री-कट घेतल्यानंतर ३५ ते ४० दिवसात तारेजवळ शेंडा पीचिंग (पंजा मारणे) करुन ओलांडे तयार करुन त्यावर मालकाडी तयार केली जाते.हे काम जर वेळेवर करता आले नाही तर फळधारक (माल काड्यांची)संख्या कमी होते.तेव्हा तारेला ओलांडा बांधत असतांनाच निघालेल्या बगलफुटींचा मालकाड्या तयार करण्यासाठी उपयोग करावा.
री-कट घेतांना हा शक्यतो तापमान वाढत असतांना म्हणजेच १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान किंवा ज्या वेळी वातावरणातील तापमान किमान १५ अंश सेल्सिअसच्या पुढे वाढायला सुरुवात होते.आशा वेळी घ्यावा.
री-कट घेतल्यानंतर ३५ ते ४० मि.ली प्रती लिटर या प्रमाणात हायड्रोजन साईनामाईडचे पेस्टिंग करावे.यानंतर डोळे फुटण्याच्या अवस्थेत उडद्या व हिरवी अळी या पासुन संरक्षण करावे.नविन निघालेल्या फुटीपैकी जोमदार फुटी निवडाव्या बांबुला सरळ बांधुन मुख्य तारेच्या खाली ६ इंच ते एक फुट दरम्यान शेंडा पिचींग करुन इंग्रजी व्ही आकाराचे प्राथमिक (मुख्य) ओलांडे तयार करुन घ्यावे. त्यानंतर दुय्यम ओलांडे (तरसरी) तयार करतांना तारेच्या तीन-चार इंच पुन्हा शेंडा पिचींग करावा.ओलांडे तयार करतांना स्टॉप अ‍ॅण्ड गो करुन सबकेन प्रमाणे गाठी तयार कराव्या.हे करत असतांनाच निघालेल्या बगलफुटींची पाच पानांवर सबकेन करुन मालकाडी तयार करावी.शक्यतो बगल फुटी ह्या एक आड एक ठेवाव्या.नत्राचा वापर व पाण्याचे नियोजन योग्य ठेवावे. म्हणजे मालकाडी जाड होणार नाही.पाने टिकवून ठेवण्या करीता योग्य बुरशीनाशकांचा वापर करावा.युरीयासिलच्या दोन-तीन फवारण्या घ्याव्यात.पावसाळा सुरु होताच योग्य प्रमाणात बोर्डॊमिश्रणाच्या तीन-चार फवारण्या १५ दिवसांच्या अंतराने कराव्या.योग्य मालकाडीसाठी किमान १२ ते १५ पाने असावे. तयार केलेल्या मालकाडी पक्व होण्यासाठी पालाशची मात्रा देउन काडी पक्वता करुन घ्यावी.



’रि-कट’ घेउन करा दर्जेदार मालकडी

द्राक्षबागेत रि-कट घेतांना ज्या ठिकाणी काडीची योग्य जाडी असेल व डोळे फुगलेले कसदार असेल त्या ठिकाणी रि-कट घेउन निघालेल्या फुटीची योग्य निगा राखुन तारेच्या खाली सहा इंचावर पंजा मारावा.
पंजा मारल्या नंतर मुख्य ओलांडे तयार करुन पाच-सहा पानावर शेंडा मारुन पुन्हा पुढे वाढ्वुन घ्यावा.म्हणजेच मुख्य ओलांडे (तरसरी) तयार करतांना सबकेनचा अवलंब करावा.त्याच बरोबर ओलांड्या वरील निघालेल्या बगलफुटी एक आड एक ठेवुन त्यांची पण सबकेन करावी. याच बगलफुटीच्या आपण य़ोग्य निगा राखुन त्यावर लिहोसीन,युरीयासील, व सिक्स बी.ए यांची योग्य प्रमाणात वेग वेगळी फवारणी घ्यावी. पानांची निगा ठेवण्यासाठी बुरशीनाशक तसेच किटकनाशक यांच्या फवारण्या घ्याव्या. फळछाटणी पर्यत पाने टिकविण्य़ासाठी बोर्डॊ मिश्रण दोन -तीन फवाण्या १५ दिवसांच्या अंतराने घ्याव्या.

’रि-कट ’घेतल्या नंतरचे व्यवस्थापन


रि-कट घेतल्या नंतर वातावरणातील तापमानाचा पुरेपुर उपयोग घेउन डोळे फुटण्याची आवस्था सुरु होते.जर री-कटपुर्वी  कलम केलेल्या सात ते आठ डोळावरुन पानगळ करुन घेतल्यास डोळे लवकर फुटतात.
दिवसाचे कमाल तापमान वाढत असतांना म्हणजेच १५ फेब्रुवारी च्या दरम्यान जर री-कट घेतल्यास वाढत्या तापमानाचा उपयोग करुन मे-जुन महिन्या पर्यंत चांगल्या प्रकारे ओलांडे तयार होऊन काडी तयार होते.अशा बागेत काडीमध्ये फलधारणा होउन घडनिर्मीती चांगल्या प्रकारे होते.
बागेतील व्यवस्थापन :
रि-कट घेण्याची जागा : कलम केलेल्या जोडा नंतर सात ते आठ डोळावर रि-कट घेउन हायड्रोजन सायनामाईड ३० ते ३५ मि.ली प्रती लिटर प्रमाणात रि-कट घेतलेल्या दोन-तीन डोळयांना चोळावे.
नविन फूट निघणे : रि-कट नंतर नविन फुटी निघायला सुरुवात होते.अशा वेळी उडद्या किडी सरंक्षण करावे. निघालेल्या  फुटी मधुन सरळ सशक्त जोमदार अशा दोन फुटी निवडाव्या त्यानंतर पुन्हा जोमदार फुटी पैकी एक फुट  निवडावी व दुस-या फुटीचा पाच-सहा पानावर शेंडा मारावा.फुट पुर्णपणे काढू नये कारण काडीवर नविन फुट बांधतेवेळी कुठ्ली हि समस्या निर्माण होऊ शकते.
खत व्यवस्थापन : बागेत नविन निघायला सुरवात झाली, की वाढीचा जोम चांगला असणे फार महत्वाचे असते या साठी योग्य प्रमाणात नत्राचा ह्प्ता द्यावा.त्यानंतर स्फुरद व पालाश यांच्या मात्रा द्याव्या. त्याच प्रमाणे सुक्ष्म अन्नद्रव्ये योग्य प्रमाणात द्यावे



खरड छाटणीतील महत्वाची कामे


द्राक्ष पिकात दोन वेळा छाटणी करावी लागते.पहिली छाटणी ही माल काढल्यानंतर केली जाते, तिला खरड छाटणी ( एप्रिल छाटणी ) असे म्हणतात,तर दुसरी छाटणी ही ऑक्टोंबर महिन्यात घड बाहेर निघण्याकरीता केली जाते,तिला फळ छाटणी किंवा गोडबार छाटणी म्हणतात.निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन घेण्यासाठी द्राक्ष बागेची काळजी ही खरड छाटणीपासुन घेणे अति महत्वाचे असते
खरड छाटणी
* खरड छाटणीच्या १५-२० दिवस आगोदर २ ट्रक चांगले कुजलेले शेणखत व १०० ते १२० किलो स्फुरद ( दाणेदार) प्रति एकर द्यावेत.
* खुटावरील द्राक्षबागेस स्वमुळावरील द्राक्षबागेच्या तुलनेत ३-४ दिवस पाण्याचा ताण जादा द्यावा.
* रूट-स्टॉकवरील जुन्या द्राक्षबागेत फुटी एक सारख्या निघण्यासाठी हायड्रोजन साईनाईडचा (डॉरमेक्स,क्रिड्रार) वापर करावा.
*  छाटणीनंतर डोळे फुटण्याच्या अवस्थेत उड्द्या करीता कॉन्फीडोर १/२ मि.ली या प्रमाणात फवारणी घ्यावी.
* ५-६ पानांची अवस्था असतांना अशक्त, ड्ब्बलअसणा-या काड्या काढुन प्रत्येक स्क्वेअर फुटास एक काडी राखावी.
* छाटणीनंत्तर २५ दिवसांपर्यत नत्र व पाणी भरपुर द्यावे व वाढ करुन काडी जोमदार करुन घ्यावी.
* जोमदार वाढीच्या (५-६ पानांच्या) अवस्थेत वाढविरोधक म्हनुन फवारणी घ्यावी.
* बागेला आवश्यक असलेले पाणी उपलब्ध असलेतरच ९ पानांच्या अवस्थेत ६ ते ७ पानांवर सबकेन करावी अन्यथा सरळ काडी ठेवावी.
* ४० ते ५५ दिवसांच्या कालावधीत नत्र बंद करुन  पाण्याची मात्रा १/३ कमी करावी.
* ४५ ते ६० दिवसां  दरम्यानच्या काळात ५० किलो प्रति एकर पालाश ( SOP) द्यावे,यामुळे द्राक्षकाडी सशक्त होते.
* ५ पाने आणि १२ पाने या अवस्थेत ५० पी.पी.एम युरासिल संजीवकाची फवारणी घ्यावी.
* ४० ते ४५ दिवसांत १० पी.पी.एम ६-बीए ची फवारणी करावी.
* १५ पाने येताच किंवा काडी आडवी पडण्याच्या आत शेंड्याचे पिचींग करुन घ्यावे.
* ऑक्टोबर छाटणी पर्यत पाने टिकवण्यासाठी  १/२ % बोर्डॊंमिश्रण सुरुवात करुन पावसाळ्यात १% बोर्डॊ मिश्रणाची फवारणी करत राहावी.

खरड छाटणी पूर्व तयारी

द्राक्ष पिकाचा हंगाम मार्च अखेर संपुष्टात येतो.पुन्हा नवीन हंगामाच्या कामांची एप्रिल पासुन सुरुवात होते.एप्रिल छाटणीस खरड छाटणी असं ही संबोधतात.द्राक्ष पिकाचा दॄष्टीने हि छाटणी अत्यंत महत्वाची असते.कारण भविष्यात येणारा माल याच छाटणीत तयार होतो. म्हणुन हि छाटणी अत्यंत महत्वाची असते.
द्राक्ष माल काढणीनंतर १५ ते२५ दिवस वेलींना विश्रांती दिल्यानंतर योग्य मशागत करुन तसेच बोदावर वेलीच्या दोन्ही बाजुने २ ते ३ इंच चर घेउन एकरी दोन ट्रक सुकेशेणखत टाकावे, शेणखतावर २०० ते २५० किलो सुपरफॉसस्फेट दानेदार स्वरुपात टाकावे.मातीआड करुन बागेस भरपुर पाणी द्यावे.असे केल्याने द्राक्षाची सुप्त अवस्थेतील मुळी पुन्हा चालु होते. व आठ ते दहा दिवसांत कार्यरथ होते.वापसा येताच छाटणी करावी.छाटणी करतांना शक्यतो दोन डोळे राखुन छाटणी करावी.खते व पाणी व व्यवस्थापन करत असतांनाच १८-४६ किंवा २०-२०-० एकरी दोन गोणी तसेच जनरल मायक्रोन्युटीयन्ट्य़स स्फुरदयुक्त खतानंतर आठ ते दहा दिवसांनी द्यावे.
      जमिनीच्या प्रतवारीनुसार पाण्याचे नियोजन करावे. मुरमाड जमिनीतील बागेस तीन दिवसाच्या अंतराने २ ते   २II तास ड्रिपने पाणी द्यावे,यांमुळे योग्य वापसा टिकवून राहतो आणि चांगली कॅनोपी मिळण्यास मदत होते.छाटणी नंतर २५ ते ३० दिवसांनी १९-१९-१९  वॉटर सोल्युबल फर्टीलाझर एक गोणी चार वेळेस करुन ३ ते५ दिवसांच्या अंतराने द्यावी.युरीयाची मात्रा देउ नये कारण १८-४६ मधील आधिक १९-१९-१९ मधील नत्र पुरेसे होईल.यामुळे काडी एक सारखी होण्यास मदत होईल.


प्रत्यक्षात ऑक्टोबर छाटणी


मागील लेखात आपण ऑक्टोबर छाटणी नियोजन या विषयी माहिती घेतली आता पाहू प्रत्यक्षात ऑक्टोबर छाटणी कशी करावी. प्रत्यक्ष छाटणी करण्यापुर्वी वेलीवर पाने राहिली असल्यास त्वरीत हाताने काढावी.नंतर सूक्ष्मघड तपासणीच्या अहवालानुसार ७, ८,किंवा ९ डोळे राखून छाटणी करावी.द्राक्षबागेमध्ये सबकेनचा अवलंब केलेला असल्यास सबकेनच्या पहिल्या किंवा दुस-या डोळ्यावर छाटणी करावी.
छाटणीनंतर करावयाची महत्वाची कामे:
१) छाटलेल्या काडया आणि जमिनीवर पडलेली पाने गोळा करून बागेच्या बाहेर दुरवर नेऊन जाळावे.रोगग्रस्त काडया किंवा पाने बागेत किंवा जवळपास टाकल्यास रोगाचे अनकूल वातावरण मिळाल्यास त्यावर रोगपरत्वे बुरशीची वाढ होते.आणि नंतर त्याचा प्रसार नवीन फुटीवर होतो.त्यामुळे रोगास सहज आमंत्रण तर मिळतेच आणि नंतर नियंत्रण करण्यासाठी खूप किंमतीच्या औषधांची फवारणी करावी लागते. 
२) खोडावरील साल काढावी आणि बोर्डोपेस्ट लावावी.छाटणी झाल्यावर त्वरीत खोडावरील साल खरडून काढावी.सहज निघत नसेल,तर खोड पाण्याने ओले करून साल काढावी.कारण साली आड उडद्या,पिठ्या ढेकुण तसेच इतर रोगांची बुरशी दडून बसते.डोळेफुटल्यावर उडद्या रात्री बाहेर येऊन डोळे फस्त करतात, तर पिठ्या ढेकुण (मिलीबग) सुप्त अवस्थेत वाढत राहतो.हे टाळण्यासाठी खोडावरील साल काढणे अतिशय महत्वाचे असते.
डोळे फुटण्यासाठी काळजी घेणे:

आक्टोंबर छाटणी


निर्यातक्षम द्राक्षाला युरोपमध्ये भरपूर बाजारभाव मिळतो .अर्थात द्राक्ष गुणवत्तेसंबधी युरोपातील ग्राहकाच्या अपेक्षा वेगळ्या असतात आणि त्या अपेक्षांची पुर्ती ते कटाक्षाने पाळतात .अशी गुणवंत द्राक्ष पिकवणे हे दिव्यच मानले  जाते . हे साध्य करण्यासाठी द्राक्ष शेतीमधील अनेक महत्वाची कामे अगदी कटाक्षाने ह्तालावी लागतात.
    समशीतोष्ण हवामानात द्राक्ष वेलीची वाढ सतत होत असते .म्हणून द्राक्षाची वर्षांतून दोन वेळेस  छाटणी  करतात .पहिली छाटणी एप्रिल मध्ये तिला खरड छाटणी किंवा एप्रिल छाटणी म्हणतात .या छाटणीचा उद्देश कड्यांमधील डोळयांनमध्ये शाश्वत सूक्ष्म घड निर्मिती करणे .द्राक्षाची दुसरी छाटणी आक्टोंबर मध्ये करतात तिला ऑक्टोबर छाटणी किंवा गोडी छाटणी म्हणतात .उत्पादनाच्या द्रष्टीने दोन्ही छाटणीला सारखेच महत्व आहे. येथे आपण ऑक्टोबर छाटणीचे महत्व या विषयी घेणार आहोत.
 द्राक्षाची आक्टोंबर छाटणी :
खरड छाटणी नंतर वेलीच्या कांड्यावरील डोळ्यामध्ये सूक्ष्म घड निर्मिती झालेली असते. या काडया ठराविक पद्धतीने छाटून तयार झालेले सूक्ष्मघड डोळे फुटल्यानंतरच बाहेर येतात म्हणून आक्टोंबर छाटणी करणे आवश्यक असते.द्राक्षवेलीच्या काडीवरील डोळे  संयुक्त असतात .म्हणजेच एका डोळ्यामधून एक ,दोन किंवा अधिक फुटी येण्याची क्षमता असते.आणि हे डोळे फुटल्यावर अगोदर पानाची फुट येते .नंतर पाचव्या किंवा सहाव्या पानांनंतर  घड लागतात .अर्थात घड लागणे ही शरीरशास्रीय क्रिया जाती परत्वे विभिन्न असते.द्राक्षवेलीची शरीरशास्त्रीय दृष्टीकोनातून  काळजी घेणे आवश्यक असते .अन्यथा अधिक वांझ डोळे फुटण्याची शक्यता असते
  ऑक्टोबर छाटणीची वेळ :
द्राक्षाची ऑक्टोबर छाटणी ऑक्टोबर महिन्याच्या दुस-या किंवा तिसरया  आठवड्यामध्ये करण्याची शिफारस आहे.परंतु सध्या स्थितीत आक्टोबर छाटणी लवकर किंवा उशिराही करतात .यामुळे काही समस्यांना सामोरे जावे लागते .म्हणून येणाऱ्या समस्या समजून घेणे तितकेच महत्वाचे असते. निर्यातक्षम तथा उच्च प्रतीच्या द्राक्षमध्ये शर्करा ;आम्लतेचे गुणोत्तर ४०:१ ते ४५:१ च्या दरम्यान असणे आवश्यक असते.हे साध्य करण्यासाठी ऑक्टोबर छाटणी ऑक्टोबरच्या मध्यास करणे हितावह ठरते .
ऑक्टोबर छाटणीचे नियोजन :

द्राक्ष वेलीचे पोषण


Gapevine Nutrion  
द्राक्ष वेलीच्या पोषणावर द्राक्षाची गुणवता आणि उत्पादन अवलंबून असते म्हणून शेतकरी अनेक रासायनिक खतांचा,जैविक आणि जीवाणू  खतांचा उपयोग करतात,त्याच बरोबर द्राक्षवेलीला खत देण्याच्या पद्धतीमधे सुरुवातीला नत्र,फुगवणीच्या काळामध्ये स्फुरद आणि शेवटी द्राक्षतयार होण्याच्या वेळेस पोटॅश यापद्धतीने खतांच्या मात्रा दिल्या जातात आणि ही खते देत असतांना डोळ्यासमोर गुणवत्तायुक्त उत्पादन उदिष्ट ठेवूनच दिले जातात.त्यात द्राक्ष पिकाची गरज,जमिनीत उपलब्ध असलेली खते त्याच बरोबर वेलीतील स्टोरेज या गोष्टीकडे फारसे लक्ष दिले जात नाही.केवळ खतांच्या असंतुलीत वापराने अनेक रोग किडी त्याच बरोबर विकृतीचा द्राक्ष उत्पादन घेत असतांना सामना करावा लागतो.केवळ अन्न्द्रव्यातील एकाच घटकामुळे वेलीचे पोषण होईल असे नाही,तर एक रासायनिक घटकांवर त्याचा विपरीत परिणाम होतो याकडे देखील लक्ष देणे शेतक-यांना गरजेचे आहे.

द्राक्षबाग उभारणीतील महत्वाचे टप्पे


नवीन द्राक्ष बाग उभारण्याकरीता अनेक गोष्टींचा सुरवातीपासुनच विचार करावा लागतो. जमीन आणि पाण्याची प्रत, हवामान यानुसार खुंटरोपाचा  वापर करुनच द्राक्ष लागवड  करण्याची शिफारस केली जाते. त्याचा विचार करता सुरवातीपासुनच काळजी घेणे आवश्यक आसते.
द्राक्ष बाग उभारणी मध्ये  रोगांच्या, तसेच घडनिर्मीतीच्या द्धष्टीने हवामानातील घटकांचा(तापमान,सुर्यप्रकाश व सापेक्ष आद्रता)विचार
करणे गरजेचे आहे.
भारी जमीनीत एक दिवसाआड,तर हलक्या जमीनीत रोज पाणी देणे गरजेचे आहे.                  
लागवड करण्यापुर्वी जमीन सपाट करुन ,लव्हाळा व
 हरळी या प्रकारच्या तणांचा नायनाट करुन घ्यावा.
उन्हाळ्यात पाण्याची कमतरता असल्यास शक्यतोवर
 ड्रिपरच्या खाली गवत, काडीकचरा,पाचट इ.चा
वापर करुन आच्छादन करावे.शक्यतोवर पाणी किंवा सायं काळी जेव्हा तापमान कमी                                                    असते.अशा वेळी द्यावे.
ज्या भागात सतत पाउस सुरु असतो किंवा
वाढीच्या अवस्थेत आद्रता जास्त काळ टिकून राहते अशा ठिकाणी
 रोगांचा प्रादुर्भाव जास्त होउ शकतो.तेव्हा शेजारच्या जागेत जास्त आद्रता
निर्माण करणारे पीक टाळावे.
वाढीच्या दुस-या टप्प्या मध्ये मुळांचा चांगला विकास होईल,या दॄष्टीने स्फुरदाची उपलब्धता करुन द्यावी.
खुंटरोपाच्या प्रत्यक्ष लागवडीच्या साधरणता एक महिण्यापुर्वी चारी घ्यावी.                              खुंटरोपाची पाने जुनी होतांना तांबेराचा प्रादुर्भाव दिसु शकतो.तेव्हा योग्य उपाय करावा.          
रुटस्टॉक लागवड ही वातावरणातील
 तापमान १५ अंश सेल्सीअसच्या पुढे जायला
सुरवात होते.अशा वेळी करावी.                                                      
कलम जमीनी पासुन दिड ते दोन फुट अंतरावर केले जाते.या ठिकाणी काडीची जाडी आठ-दहा मि.मी मिळणे आवश्य आहे.           
खूंटरोप लागवड केल्यानंतर नविन मुळे फुटे पर्यंत व नविन फुट दिसे पर्यंत  फक्त पाणी द्यावे.                                        खुंटरोपाची काडी परीपक्व होण्य़ासाठी पालाशची योग्य
मात्रा द्यावी.
खुंटरोपांच्या मुळांचा जमीनीमध्ये  चांगल्या
 रीतीने विकास होण्याकरीता सुरवातीचे ५० ते ६०                                    दिवस वरच्या फुटीची वाढ होउ द्यावी.
कलम करते वेळी खुंट रोपाची काडी  रसरशीत   असणे आवश्यक आहे.
लागवडीच्या ६० दिवसा नंत्तर खुंटरोपांचा
जमीनी  पासुन खरड री-कट घ्यावा. नंतर
निघालेल्या नविन फुटी पैकी तीन-चार सरळ चांगल्या रोग व किडमुक्त अशा फुटी बांबुला बांधाव्यात. 
शक्यतो कलम करण्यापुर्वी एक महिना आगोदर शेणखत + सुपर फॉस्फेटची योग्य मात्रा द्यावी.                                      
खुंटरोपाची   शाकीय  वाढ  होण्याकरीता नत्र  व  स्फुरदाची  योग्य  मात्रा  देउन  पाण्याचा वापर  भरपुर करावा.

नवीन द्राक्षबागेची लागवड

मित्र हो,
नगदि पीक म्हणुन द्राक्ष लागवड करुन भरपुर उत्पादन घेण्याची प्रत्येक द्राक्षबागायतदाराची अपेक्षा असते.द्राक्ष हे पीक बहुवर्षीय असुन,एकदा लागवड केल्यानंतर पिकाचे आयुष्यमान १२-१४ वर्ष असते.तेव्हा लागवडी संदर्भातील    
प्रत्येक गोष्टी बारकाईने समजुन घेणे फारच महत्वाचे असते.
द्राक्ष पीक हे देशातील सर्वात महत्वाचे फळपीक मानले जाते.महाराष्ट्रात प्रामुख्याने नाशिक, सांगली, पुणे व सोलापुर जिल्हात लागवड केली जाते.द्राक्ष पिकाच्या वाढीकरीता , तसेच उत्पादनास पोषक असे वातावरण या विभागात आढळते.द्राक्ष हे पीक बहुवर्षीय असल्याने त्याच्या लागवडीसंबंधी सर्व बाबींची सविस्तर माहिती असणे आवश्यक आहे.
आवश्यक घटक

subscribe nashikgreps

Get Nashikgreps, Straight in your inbox !

Friends, Now you can get a daily dose of "Nashikgreps" directly in your mailbox. Just insert your email address in the subscription form. Wish you a happy read !

NASHIKGREPS straight in your inbox/आता नाशिक ग्रेप्स् मिळवा थेट इमेल द्वारे/खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या./Enter your email address:


Delivered by FeedBurner

निर्माता/लेखक

द्राक्ष बागायतदरांना अतिशय सोप्या भाषेत द्राक्षनिर्याती सबंधी माहिती पुरविणारे संकेतस्थळ! योग्य लागवड व्यवस्थापन असेल,तसेच निर्यातक्षम माल पिकवला ,तर हे पीक चांगला नफा देऊन जाते.परंतू येत्या काळात लागवड वाढून उपयोग नाही,तर प्रति हेक्टरी नफा कसा वाढेल याकडे लक्ष दिले गेले पाहिजे.

Mobile Phone

Get news on the go Type nashikgreps.com in your mobile phone web browser for free access anytime,from any place. The content is formatted specifically for cell phones and mobile devices.

Creative Commons License
Copyright © 2011 All rights reserved.| privacy-policy |nashikgreps.|RSS Feeds

  © Blogger template Webnolia by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP