खाली दिलेल्या रिकाम्या जागेत तुमचा ई-मेल ऍड्रेस देऊन subscribe वर क्लिक केल्यास nashikgreps.com वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखांची नोंद तुम्हाला तुमच्या inbox मध्ये मिळेल.
Delivered by FeedBurner

गडलिंग म्हणजे काय?

गडलिंग म्हणजे काय?
द्राक्षवेलीच्या खोडावरील बाह्य भागास (साल)प्लोएम असे म्हणतात,तर त्याखालील आतील पांढ-या आवरणास  झायलेम असे म्हणतात.झायलेम व प्लोयम या भागांतून जमिनीतून तसेच वरून खाली येत असलेल्या अन्नद्रव्याचा पुरवठा हा खोडावर ठराविक जाडीची खाच करून खंडीत केला जातो.खोडावर दोन मि.मी.खोलीची साल विशिष्ट पात्याच्या (चाकू)साह्याने काढली जाते.याच पद्धतीला गडलिंग असे म्हणतात.
गडलिंग कसे व कधी करावे?
गडलिंग कसे करावे व नेमक्या कोणत्या आवस्थेत करावे,असा प्रश्न अनेकांच्या मनात उभा राहतो.सध्याच्या परीस्थित निर्यात होणारी थॉमसन सीडलेस व तास-अ-गणेशवर केलेल्या गडलिंगचे परिणाम चांगले आढळून येतात;परंतु वेगवेगळ्या द्राक्ष जातीमध्ये गडलिंग केल्यानंतर त्या वेलीचा प्रतिसाद वेगवेगळा असतो.त्यामुळे मण्याच्या वाढीची अवस्था व द्राक्ष जात यामध्ये वेळ साधून केलेले गडलिंग मण्यांची जाडी वाढून देण्यास कारणीभूत ठरते.
  फुलोरा अवस्थेत केलेल्या गडलिंगमुळे शोर्ट बेरीज प्रमाण जास्त वाढण्याची भीती असते,यामुळे गडलिंग थोडी उशीरा करतो; परंतु मण्यांचा आकार (सेटिगनंतर) प्रत्येक दिवशी वाढतांना दिसतो.उशिरा केलेल्या गडलिंगमुळेसुध्दा चांगले परिणाम आढळून येत नाही.अनेक संशोधन केंद्रात झालेल्या संशोधनाच्या अनुमानानुसार स्पष्ट झाले,की थॉमसन सीडलेस या जातीमध्ये पाच ते सात मि.मी.मण्याच्या आकारमानाच्या वेळी गडलिंग केल्यास,घडाचा आकार वाढून घेतल्यास चांगला फायदा झाला,तर हेच गडलिंग शरद सीडलेस या जाती मध्ये (Black) आठ ते दहा मि.मी.मण्यांच्याआकाराच्या वेळी केल्यास मण्यांचा आकार जास्त वाढल्याचे आढळून आले.माझ्या मते द्राक्षवेलीची गडलिंगची वेळ ही छाटणी पासून दिवस मोजून न करता वेगवगळ्या वातावरणात छाटणीपासून गडलिंगची अवस्था येण्याचा कालावधी कमी-अधिक लागतो त्यामुळे मण्यांची अवस्था पाहूनच  गडलिंग केल्यास त्याचे चांगले परिणाम आढळून येतात.मण्यांच्या वाढीच्या या अवस्थेत पेशी विभाजनाचे कार्य जोमात सुरु असते व त्यामुळेच गडलिंगचा परिणाम आढळून येतो.साधारणत: दोन मि.मी जाडीची गोलाकार गडलिंग करून,मण्यांची फुगवण चांगली होते.शक्यतो गडलिंगचा आकार(कमी-जास्त जाडीचे गडलिंग)हा त्या वेळीमध्ये झालेले अन्नद्रव्य ,वेलीचाविस्तार,कार्यक्षम पांढरीमुळी,काडीवर पानांची संख्या इ.गोष्टीवर अवलंबून असतो.कारण गडलिंग करणे म्हणजे वेलीला एक प्रकारची जखम करणे होय.तेव्हा ही जखम शक्य तेवढ्या लवकर भरून येणे सुध्दा तेवढेच गरजेच असते.ही जखम भरून येईपर्यत त्या घडाच्या विकासाकरिता आवश्यक असलेले अन्नद्रव्य वेलीमधून मिळणे महत्वाचे असते.म्हणूनच  गडलिंगची जखम तीन आठवडयापर्यत भरून यावी व घडाच्या विकासामध्ये कुठलेही आडथळे येऊ नयेत याकरिता दोन मि.मी पर्यतचे गडलिंग आपल्या जमिनीत फायद्याचे ठरते असे मानले जाते.
गडलिंग करतांना घ्यावयाची काळजी:
गडलिंग केल्यानंतर घडाचा आकार वजन वाढतांना आपण पाहतो;परंतु हे मिळून येण्याकरीता फक्त गडलिंगची मदत होत नाही,तर वेलीवरील घडांची संख्या, मण्याचे योग्य वेली थिनीग करणे इत्यादी गोष्ठी जास्त महत्वाच्या आहेत.ज्या वेलीला अन्नद्रव्याचा कुठल्याही प्रकारचा तुटवडा किंवा ताण पडणार नाही याची काळजी घेऊन,आवश्यक ते अन्नद्रव्य तसेच संजीवकांची उपलब्धता करून द्यावी.गडलिंग करतांना एकसारख्या आकाराची,गोलाकार साल निघेल याची काळजी घ्यावी.
गडलिंगनंतर काय करावे:

गडलिंग केल्यानंतर खोडावर जखम तयार होते.या जखमेतून रोग व किडी यांचा वेलीच्या  शरीरात प्रवेश होऊ नये या करीता कॉपरयुक्त बुरशीनाशक किंवा बाविस्टीन सारख्या बुरशीनाशकाचे मिश्रण लावल्यास जखमे पासून वेलीचेसंरक्षण करता येते.माझ्या अनुभवानुसार गडलिंगच्या जखमेवर इंडोल बुरातिक असिड (Indol-3Butric Acid) चे द्रावण योग्य प्रमाणात लावल्यास जखम लवकर भरून तर येतेच व  रोग जंतूचा शिरकाव कमी होतो.
गडलिंगमुळे वेलीत होणारे बद्दल:  
वेलीच्या पानांची प्रकाश संश्लेशणद्वारे तयार केलेले अन्नपदार्थ(कर्बोदके)हे मुळाकडे व इतर भागांकडे नेण्याचे कार्य प्लोएम(बाहेरील साल)करत असते,तर मुळानी उचलले पाणी व अन्नद्रव्ये मुळांनकडून पानांनपर्यत पोहचवण्याचे कार्य झायलेम करत असते. गडलिंग केल्यामुळे प्लोएम या भागातील बांगडीच्या आकाराचा एकसारखा जाडीचा काप घेतल्यामुळे मुळाकडे जाण्या-या अन्नद्रव्याचा पुरवठा खंडीत होतो.यामुळे वेलीमधील संजीवक व अन्नद्रव्याची(कर्बोदकांची ) पातळी वाढवून सर्व गोळा झालेले अन्नद्रव्ये व संजीवक हे सिंक(विकसित घड )ओढून घेते व परिणामी मण्यांची फुगवण,घडाचे वजन व मण्यासोबत देठाची मजबुती वाढण्यास मदत होते.
गडलिंग केल्यानंतर जवळपास एक महिन्यापर्यत प्रकाशसंश्लेषण क्रिया संजीवकांचे वहन खालच्या भागात होत नसल्यामुळे मंदावते.कारण पानांनमध्ये तयार होणारे आब्सिसीस असिडचे वहन हे गडलिंग केल्यामुळे वेलीच्या खोडाच्या खालच्या भागात जात नाही.त्यामुळे वरच्या भागात याचे प्रमाण वाढवून स्टोमॅटो बंद होतांना अनुभवास येते. या परीस्थीतीमुळे प्रकाश संश्लेषणाचे प्रमाण होते.
---------------------------------------------------------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

निर्माता/लेखक

द्राक्ष बागायतदरांना अतिशय सोप्या भाषेत द्राक्षनिर्याती सबंधी माहिती पुरविणारे संकेतस्थळ! योग्य लागवड व्यवस्थापन असेल,तसेच निर्यातक्षम माल पिकवला ,तर हे पीक चांगला नफा देऊन जाते.परंतू येत्या काळात लागवड वाढून उपयोग नाही,तर प्रति हेक्टरी नफा कसा वाढेल याकडे लक्ष दिले गेले पाहिजे.

Mobile Phone

Get news on the go Type nashikgreps.com in your mobile phone web browser for free access anytime,from any place. The content is formatted specifically for cell phones and mobile devices.

Creative Commons License
Copyright © 2011 All rights reserved.| privacy-policy |nashikgreps.|RSS Feeds

  © Blogger template Webnolia by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP