ऑक्टोंबर छाटणीनंतर सुरुवातीला घड पोंग्यात असतांना कमकुवत दिसतात बाग १२ ते १४ दिवसांची असतांना घड बाळी पकडतो आणि शेंडा जोरात चालुन घड १५ ते १६ दिवसांत पांढरा पडून १८ ते २० दिवसांपर्यत संपुर्ण दिसेनासा होतो किंवा गोळी होउन गळुन पडतो.ह्या समस्येस "घड जिरणे" असे म्हणतात.घड संपुर्ण जिरल्यानंतर द्राक्षबाग ही फेल घोषीत होउन द्राक्षबागायतदारांचे १ वर्ष (हंगाम) वाया जाते.
का जिरतात घड ?
एप्रिल छाटणीनंतर काडी पक्व होण्याच्या दॄष्टीने कामे करण्याचे सातत्य नसेल आणि काडी पक्व होण्याआगोदर वेलीची पानगळ झाल्यास किंवा ऑक्टोंबर छाटणीनंतर वातावरण चांगले असेल तरी घड जिरतात तसेच सर्व कामे व्यवस्थीत करुन देखील छाटणी छाटणीनंतर आभाळीवातावरण(ढगाळ) आणि पाउस पडल्यास आणि बागेतील पाण्याचा योग्य निचरा न झाल्याने देखील द्राक्षघड जिरतात.आभाळीवातावरण त्यातच जादा पाउस पडून घड जिरतात म्हणजेच घड जिरण्याची समस्या हि द्राक्ष वेलीच्या मुळाशी निगडीत आहे.प्रथम हे लक्षात घेतल्यास आपली द्राक्ष घड वाचवणे सोपे होईल.



