ऑक्टोंबर छाटणीनंतर सुरुवातीला घड पोंग्यात असतांना कमकुवत दिसतात बाग १२ ते १४ दिवसांची असतांना घड बाळी पकडतो आणि शेंडा जोरात चालुन घड १५ ते १६ दिवसांत पांढरा पडून १८ ते २० दिवसांपर्यत संपुर्ण दिसेनासा होतो किंवा गोळी होउन गळुन पडतो.ह्या समस्येस "घड जिरणे" असे म्हणतात.घड संपुर्ण जिरल्यानंतर द्राक्षबाग ही फेल घोषीत होउन द्राक्षबागायतदारांचे १ वर्ष (हंगाम) वाया जाते.
का जिरतात घड ?
एप्रिल छाटणीनंतर काडी पक्व होण्याच्या दॄष्टीने कामे करण्याचे सातत्य नसेल आणि काडी पक्व होण्याआगोदर वेलीची पानगळ झाल्यास किंवा ऑक्टोंबर छाटणीनंतर वातावरण चांगले असेल तरी घड जिरतात तसेच सर्व कामे व्यवस्थीत करुन देखील छाटणी छाटणीनंतर आभाळीवातावरण(ढगाळ) आणि पाउस पडल्यास आणि बागेतील पाण्याचा योग्य निचरा न झाल्याने देखील द्राक्षघड जिरतात.आभाळीवातावरण त्यातच जादा पाउस पडून घड जिरतात म्हणजेच घड जिरण्याची समस्या हि द्राक्ष वेलीच्या मुळाशी निगडीत आहे.प्रथम हे लक्षात घेतल्यास आपली द्राक्ष घड वाचवणे सोपे होईल.
घड जिरण्यावर नियंत्रण कसे मिळवावे:-
ऑक्टोंबर छाटणीच्या दरम्यान किंवा १० ते १२ दिवस आगोदर ट्रायकोडर्मा हर्जीयानम,विरडी आणि लॉगीफोअम ४ किलो आणि खराब १ किलो गुळ साधारण १० लिटर पाण्यात मिसळून २४ तास हवाबंद टाकीत मिश्रण ठेवावे. व त्याचे ५०० लिटर पाणी करुन ३०० लिटर ड्रिप मधुन सोडावे.बाकी इतरत्र बोदावर जमिनीवर बागेत फवारावे त्यामुळे मुळावरील आणि बागेतील प्युजारीअम आणि फायटोप्थरा ह्या हानीकारक बुरशीचा नाश होउन मुळं आणि बागरोगमुक्त होते.थोडयाच दिवसात नविन पांढरी मुळी ५ ते ७ दिवसाच्या आत चालु होते. छाटणी नंतर घड पोंग्यात येईपर्यत पांढरी मुळी फुटण्यास सुरुवात होते.त्यामुळे घडाच्या जडण घडणासाठी लागणा-या एन्झाईमची वेल निर्मीती करते आणि घडजिरण्यावर ब-याच प्रमाणात नियंत्रण मिळते.
घड जिरण्यावर प्रत्यक्ष नियंत्रण:-
प्रतिकुल परीस्थीतीत व्यवस्थापनातील सर्व उपाय योजना करुन देखील घड जिरतात तेव्हा द्राक्ष बागायतदारांना गरज भासते ती शास्रशुध्द मार्गदर्शनाची आणि झटपट उपचाराची.द्राक्षवेलीची मुळी अडचनीत असतांना देखील द्राक्षवेलीची नविन फुट जोरदार वाढते त्यासाठी लागणारे पोषण हे खोड आणि स्टोरेजचा वापर करुन होते.परंतु जस-जसे स्टोअरेज कमी पडते तसे-तसे घड जिरतात तेव्हा १२ व्या दिवशी क्लोरोमेक्वॉट क्लोराईड ५०% एस एलचा १ मिली प्रतीलिटर या प्रमाणात फवारा घ्यावा.किंवा १५ मिली टिल्ट + ४०० मिली कुमान-एल २०० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.व त्या पाठोपाठ पॉटॅशिअम डायअर्थोफॉस्पेट ४०० ग्रम + ६ बीए १० पीपी एमची फवारणी घ्यावी.किंवा स्टीम आर्धा मिली या प्रमाणात फवारणी करावी.सदर फवारणीने ८० ते ९०% घड जिरणे थांबेल शिवाय कॅनोपी व्यवस्थापन आणि जोम देखील वाढेल.आनुभवानुसार असे लक्षात आले कि द्राक्षवेलीची फेल फुट लवकर काढ्लेल्या वेलीवर घड जिरणे त्वरीत थांबते.तेव्हा शक्यतो फेलफुटी लवकरात लवकर काढावी.कदाचीत थंडी जास्त असेल अशा परीस्थीत घड जिरणे थांबेल ,परंतु घडाची स्टेज विशेष बदलली नाही किंवा त्याची वाढ समाधानकारक वाटली नाही तरी तो डिंपींग स्टेजला देखील जिरतो तेव्हा डेव्हलपमेंटच्या दॄष्टीने चिलेटेड झिंक १२.५% १ ग्रॅम आधिक सिलीकॉन ६५% प्रती लिटर या प्रमाणात फवारणी घ्यावी.म्हणजे द्राक्ष घडजिरणे निश्चीत थांबतील आणि आपणास द्राक्ष घड जिरण्या बद्दल काळजी राहाणार नाही.
--------------------------------------------------------------------------------------------------




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा