निर्यातक्षम द्राक्षाला युरोपमध्ये भरपूर बाजारभाव मिळतो .अर्थात द्राक्ष गुणवत्तेसंबधी युरोपातील ग्राहकाच्या अपेक्षा वेगळ्या असतात आणि त्या अपेक्षांची पुर्ती ते कटाक्षाने पाळतात .अशी गुणवंत द्राक्ष पिकवणे हे दिव्यच मानले जाते . हे साध्य करण्यासाठी द्राक्ष शेतीमधील अनेक महत्वाची कामे अगदी कटाक्षाने ह्तालावी लागतात.
समशीतोष्ण हवामानात द्राक्ष वेलीची वाढ सतत होत असते .म्हणून द्राक्षाची वर्षांतून दोन वेळेस छाटणी करतात .पहिली छाटणी एप्रिल मध्ये तिला खरड छाटणी किंवा एप्रिल छाटणी म्हणतात .या छाटणीचा उद्देश कड्यांमधील डोळयांनमध्ये शाश्वत सूक्ष्म घड निर्मिती करणे .द्राक्षाची दुसरी छाटणी आक्टोंबर मध्ये करतात तिला ऑक्टोबर छाटणी किंवा गोडी छाटणी म्हणतात .उत्पादनाच्या द्रष्टीने दोन्ही छाटणीला सारखेच महत्व आहे. येथे आपण ऑक्टोबर छाटणीचे महत्व या विषयी घेणार आहोत.
द्राक्षाची आक्टोंबर छाटणी :
खरड छाटणी नंतर वेलीच्या कांड्यावरील डोळ्यामध्ये सूक्ष्म घड निर्मिती झालेली असते. या काडया ठराविक पद्धतीने छाटून तयार झालेले सूक्ष्मघड डोळे फुटल्यानंतरच बाहेर येतात म्हणून आक्टोंबर छाटणी करणे आवश्यक असते.द्राक्षवेलीच्या काडीवरील डोळे संयुक्त असतात .म्हणजेच एका डोळ्यामधून एक ,दोन किंवा अधिक फुटी येण्याची क्षमता असते.आणि हे डोळे फुटल्यावर अगोदर पानाची फुट येते .नंतर पाचव्या किंवा सहाव्या पानांनंतर घड लागतात .अर्थात घड लागणे ही शरीरशास्रीय क्रिया जाती परत्वे विभिन्न असते.द्राक्षवेलीची शरीरशास्त्रीय दृष्टीकोनातून काळजी घेणे आवश्यक असते .अन्यथा अधिक वांझ डोळे फुटण्याची शक्यता असते
ऑक्टोबर छाटणीची वेळ :
द्राक्षाची ऑक्टोबर छाटणी ऑक्टोबर महिन्याच्या दुस-या किंवा तिसरया आठवड्यामध्ये करण्याची शिफारस आहे.परंतु सध्या स्थितीत आक्टोबर छाटणी लवकर किंवा उशिराही करतात .यामुळे काही समस्यांना सामोरे जावे लागते .म्हणून येणाऱ्या समस्या समजून घेणे तितकेच महत्वाचे असते. निर्यातक्षम तथा उच्च प्रतीच्या द्राक्षमध्ये शर्करा ;आम्लतेचे गुणोत्तर ४०:१ ते ४५:१ च्या दरम्यान असणे आवश्यक असते.हे साध्य करण्यासाठी ऑक्टोबर छाटणी ऑक्टोबरच्या मध्यास करणे हितावह ठरते .
ऑक्टोबर छाटणीचे नियोजन :
ऑक्टोबर छाटणी पूर्वी पावसाचे प्रमाण जास्त असते .यामुळे बागेत जास्त काळ पावसाचे पाणी साचून राहिल्यास छाटणीनंतर फलीत डोळे फुटण्यावर विपरीत परिणाम होतो.म्हणून ऑक्टोबर छाटणी पूर्वी बागेतील जास्तीचे पाणी साचू देऊ नये.ज्या बागेमध्ये योग्य निचरा नसेल किंवा चुनखडीचे प्रमाण ८ ते १० टक्यापेक्षा जास्त असेल.किंवा छाटणीपूर्वी बागेला ब-याच काळ पाणी नसल्यास बागेला भरपूर पाणी द्यावे.कारण मुळाभोवतालचे क्षार वाहून जातील ,तसेच नंतर योग्य वापसा असल्यावर मशागत करावी.छाटणीपूर्वी १५ ते २० दिवस अगोदर वेलीच्या दोन्ही बाजूने मुळाजवळ खते देण्याची तयारी करावी.
खते देणे:
ऑक्टोबर छाटणीपूर्वी आणि नंतर रासायनिक आणि सेंद्रीय खते देण्याचे प्रमाण ६०:४० असे असावे.कारण जमिनीमध्ये सेंद्रीय पदार्थाचे प्रमाण १ टक्का असावे .त्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो आणि जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.यासाठी हिरवळीची पिके तग किंवा धैच्या फुलावर आल्यावर वेलीच्या दोन्ही बाजूस एक फुट अंतरावर चर घेऊन गाडावी.हिरवळीचे खत नसल्यास किंवा कमी प्रमाणात असल्यास छाटणीपूर्वी एकरी १० टन चांगले कुजलेले शेणखत द्यावे.तसेच माती परीक्षणाच्या आधारे सूक्ष्म अन्न्द्र्वे ,छाटणीपूर्वीच एकरी १५ किलो फेरससल्फेट , १० किलो झिंकसल्फेट आणि २० किलो मॅग्नेशिअम सल्फेट द्यावे.रसायनिक खताच्या एकुन मात्रा नत्र ९०० कि.ग्रॅ.,स्फुरद ५०० कि.ग्रॅ.,आणि पालाश ७०० कि.ग्रॅ. प्रती हेक्टरी देण्याची शिफारस आहे.त्यापैकी ऑक्टोबर छाटणीनंतर नत्र ५००की.ग्र.,स्फुरद २५० कि.ग्र.आणि पालाश ४०० किलो कि.ग्र.प्रति हेक्टरी खालील प्रमाणे विभागूण द्यावे.
कालावधी नत्र स्फुरद पालाश
कि.ग्र.प्रति हेक्टरी
१)ऑक्टोबर छाटणीपूर्वी --- २५० ----
२)छाटणीनंतर १५ दिवसांनी १३५ --- ----
३)छाटणीनंतर ३० दिवसांनी १३५ --- ७०
४)छाटणीनंतर ४५ दिवसांनी ---- --- ७०
५)मण्यामध्ये पाणी उतरण्याच्यावेळी --- ---- २६०
एकूण ४०० २५० ४००
रासायनिक खतांच्या किंमती प्रति दिनी वाढत असल्यामुळे काटेकोर हिशोब ठेवणे आवश्यक आहे.त्यासाठी आवश्यक तेवढीच रासायनिक खते पान देठांच्या परीक्षणाच्या आधारे द्यावीत
छाटणीपूर्वी पीक संरक्षण:
खरड छाटणीनंतर १२० ते १५० दिवसांपर्यत शरीर शास्रीयदृष्टया योग्य असलेली पाने ऑक्टोबर छाटणीपर्यत कार्यक्षम असावी.नंतरचा पाऊस किंवा आद्रता यामुळे केवडा,करपा,भुरी या रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो.तसेच उडद्या किंवा लालकोळी या किडीची शक्यता असते.यासाठी बोर्डो मिश्रण १ टक्का तसेच ०.२ टक्के पाण्यात विरघळणारे गंधक यांची एकत्र फवारणी करावी.तसेच याचवेळी दोन टक्के फॉलीडस्टची भुकटी व ३०० मेश गंधकाची समप्रमाणात मिसळून एकरी २० किलो या प्रमाणात धुरळावी.
तण नियंत्रण:
द्राक्षबागेमध्ये हरळी,लव्हाळा,मारवेल या बहूवर्षीय तणांचे प्रमाण जास्त आढळते.छाटणीपूर्वी एक-दोन वेळेस बागेची नांगरट-कुळवणी करावी.त्यानंतर हरळी तसेच लव्हाळाच्या गाठी गोळा कराव्या.त्यानंतर पुन्हा फुटलेल्या गवतावर ग्लायफोसेट ७५० मि.ली.१०० लीटर पाणी या प्रमाणात घेऊन आवश्यकतेनुसार फवारणी करावी.
छाटणीपूर्वी संजिवकांचा/रसायनाचा वापर
ऑक्टोबर छाटणी करतेवेळी छाटणी नेमकी कोणत्या डोळ्यांनंतर करावी,हे समजण्यासाठी वेलीवरील पाने काढावी.पाने कार्यक्षम असल्यास पानांचे देठ मजबूत असतात.परंतु पाने काढणे कठीण जाते.अशी कार्यक्षम पाने काही दिवस छाटणीपूर्वी काढल्यास पानाकडून डोळ्याकडे जाणारा अन्नरस बंद होतो.त्यामुळे डोळेफुटीवर विपरीत परिणाम होतो.यासाठी इथ्रेलची फवारणी करावी.कारण यामुळे पानाकडील अन्नरसाचा प्रवाह एकदम बंद न होता.हळूहळू कमी होतो आणि पान देठामध्ये ऑबसीसिक आम्ल तयार होऊन पानगळ होते.
या करीता थॉमसनसीडलेस,तास ए-गणेश ,सोनाका या जातीसाठी थायोयुरियाची ३ ते ४ टक्के तीव्रतेने फवारणी करावी. आणि किशमिशचोर्नी,प्लेम सीडलेस या रंगीत जातीवर इथ्रेल १००० पीपीएम.या तीव्रतेची फवारणी एक आठवडा छाटणीपूर्वी करावी.येथे एक लक्षात घ्या इथ्रेलचा वापर थॉमसनसीडलेस व इतर प्रजातीवर (सोनाका,गणेश) करू नये.कारण इथ्रेलच्या फवारणी मुळे पिंकबेरीजचे प्रमाण वाढू शकते.परंतु इथ्रेलची फवारणी रंगीत जातीवर केल्यास मण्यांमध्ये रंग निर्मितीचे प्रमाण भरपूर एकसारखे होऊ शकते.
सूक्ष्म घड तपासणी:
खरड छाटणीनंतर राखलेल्या काड्यांवरील डोळयांनमध्ये सूक्ष्मघड निर्मिती होते. सूक्ष्मघड निर्मितीचे प्रमाण काडीवरील नेमक्या कोणत्या डोळ्यांमध्ये जास्त आहे, हे सूक्ष्मदर्शद्वारे तपासून पहाणे आवश्यक असते.एक एकर क्षेत्रामधून सर्वसाधारणपणे २० ते २५ काड्या वेगवेगळ्या वेलीवरील घेऊन डोळेतपासणी करावी व त्यानुसार ऑक्टोबर छाटणी करावी.थॉमसन सीडलेस व इतर प्रजातीमध्ये सूक्ष्मघड निर्मिती ७ ते ८ किंवा ९ व्या डोळ्यामध्ये हमखास झालेली असते.
--------------------------------------------------------------------------------




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा