मागील लेखात आपण ऑक्टोबर छाटणी नियोजन या विषयी माहिती घेतली आता पाहू प्रत्यक्षात ऑक्टोबर छाटणी कशी करावी. प्रत्यक्ष छाटणी करण्यापुर्वी वेलीवर पाने राहिली असल्यास त्वरीत हाताने काढावी.नंतर सूक्ष्मघड तपासणीच्या अहवालानुसार ७, ८,किंवा ९ डोळे राखून छाटणी करावी.द्राक्षबागेमध्ये सबकेनचा अवलंब केलेला असल्यास सबकेनच्या पहिल्या किंवा दुस-या डोळ्यावर छाटणी करावी.
छाटणीनंतर करावयाची महत्वाची कामे:
१) छाटलेल्या काडया आणि जमिनीवर पडलेली पाने गोळा करून बागेच्या बाहेर दुरवर नेऊन जाळावे.रोगग्रस्त काडया किंवा पाने बागेत किंवा जवळपास टाकल्यास रोगाचे अनकूल वातावरण मिळाल्यास त्यावर रोगपरत्वे बुरशीची वाढ होते.आणि नंतर त्याचा प्रसार नवीन फुटीवर होतो.त्यामुळे रोगास सहज आमंत्रण तर मिळतेच आणि नंतर नियंत्रण करण्यासाठी खूप किंमतीच्या औषधांची फवारणी करावी लागते.
२) खोडावरील साल काढावी आणि बोर्डोपेस्ट लावावी.छाटणी झाल्यावर त्वरीत खोडावरील साल खरडून काढावी.सहज निघत नसेल,तर खोड पाण्याने ओले करून साल काढावी.कारण साली आड उडद्या,पिठ्या ढेकुण तसेच इतर रोगांची बुरशी दडून बसते.डोळेफुटल्यावर उडद्या रात्री बाहेर येऊन डोळे फस्त करतात, तर पिठ्या ढेकुण (मिलीबग) सुप्त अवस्थेत वाढत राहतो.हे टाळण्यासाठी खोडावरील साल काढणे अतिशय महत्वाचे असते.
छाटणीच्या वेळी पाऊस,ढगाळ हवामान आणि कमी तापमान असल्यास डोळे लवकर फुटत नाही.आणि जे फुटतील त्यामध्ये वांज फुटीचे प्रमाण जास्त असते.,या परिस्थतीवर मात करण्यासाठी हायड्रोजन सायनामाइडचा उपयोग करावा.
हायड्रोजन सायनामाईड द्रावणाचा वापर:
छाटणीनंतर हवामानाची प्रतिकूल परिस्थती असेल,तर हायड्रोजन सायनामाईड डोळे फुटण्यासाठी प्रभावी आहे.डोर्मेक्स किंवा क्रीडोर या नावाने बाजारात उपलब्ध आहे.वातावरणाचा अंदाज पाहून हायड्रोजन सायनामाइडचे प्रमाण ३० ते ३५ मिली लिटर या प्रमाणात घेऊन त्यात स्टीकर (साबण)योग्य प्रमाणात घेऊन काडीवरील वरच्या चार डोळ्यांना लावावे.
वेल व्यवस्थापन: (Canopy management )
द्राक्षवेलीचा विस्तार आणि व्यवस्थापनाचा द्राक्ष उत्पादन वाढीमध्ये फार मोठा सहभाग असतो.वेलीचा विस्तार म्हणजे वेलीचा सांगाडा अशा पद्धतीने वाढविणे की जेणेकरून वेलीने व्यापलेले प्रत्येक सेंटीमीटर क्षेत्राचा जास्तीत जास्त उपयोग सहजतेने जास्तीत जास्त उत्पादन वाढीसाठी आणि उत्पादक्तेसाठीझाला पाहिजे.वेल विस्तार आणि व्यवस्थापणाचे काम द्राक्षाच्या खरड छाटणीनंतरच करतात.
वेल विस्तारामध्ये प्रथम वेलीचे अंतर हा मूळ पाया ठेऊन काड्यांची संख्या,काड्यांची लांबी,काडीचा व्यास आणि जाडी, पानांची संख्या, पानाचे एका काडीवरील क्षेत्रफळ, सूर्यप्रकाशाच्या दृष्टीने काड्यांची बैठक या सर्व बाबीवर घडांची संख्या,घडतील एकूण मण्यांची संख्या आणि त्यांची प्रत अवलंबून असते.यामध्ये मुख्यतः प्रति काडीवर पानांची संख्या आणि वेलीभोवती तयार झालेले सूक्ष्म हवामान आणि त्यामध्ये करण्यात येणारी मशागतिचे तसेच इतर कामे यावर वेलीचे उत्पादन अवलंबून असते.
द्राक्ष वेलीवरील काड्यांनमध्ये जास्तीत जास्त सूक्ष्मघड निर्मिती होण्यासाठी सूर्यप्रकाश आणि वेल विस्तार तसेच व्यवस्थापन यांचा एकमेकांनशी असलेला समन्वय साधण्यासाठी वेल विस्तार आणि व्यवस्थापनामध्ये पुढील तांत्रिक बाबींचा अवलंब करावा.
१ वेलीचे अंतर : ९ * ५ २ वेलीची संख्या प्रती हेक्टरी २१२० वेली
३ प्रत्येक वेलीने व्यापलेले क्षेत्रफळ : ४५ चौ.फुट ४ प्रति वेलीवर काड्यांची संख्या सव्वा ते दीड
चौ.फुटास एक काडी: ३० ते ३५
५ प्रत्येक काडीवर पानांची संख्या: १५ ते १६ ६ सरासरी प्रती पानांचे क्षेत्रफळ : १८०
चौ.सें.मी.
७ प्रेत्येक वेलीवर घडांची संख्या २५ते ३० ८ घडाचे सरासरी वजन : ४०० ग्रम
९ प्रत्येक वेलीचे उत्पादन : १२ ते १५ किलो ९ हेक्टरी उत्पादन : २६ ते २७ में टन.
संजीवकांचा योग्य वापर:
संजीवके वापरतांना द्राक्षवेलीची तसेच घडांची अवस्था,तापमाण,आद्रता या बाबींवर संजीवके वापरण्याचे प्रमाण ठरवावे.तापमाण १५ अंश सेंटीग्रेडपेक्षा कमी आणि आद्रता ४० टक्केपेक्षा जास्त असेल,तर वापरलेले संजीवकांचा जास्तीत जास्त उपयोग होतो.
द्राक्षाच्या अधिक उत्पादनासाठी संजीवकाच्या मात्रा: (जीए-३ जीब्रेलिक असिड )
वेलीची / घडाची अवस्था | संजीवक तीव्रता पीपीएम पद्धत |
१ फुटीची वाढ ६ ते पाने | सायकोसील २५०ते५०० पीपीएमफवारणी |
२ घड पोपटी रंगाचा असताना जीए -३ | १५ पीपीएम फवारणी |
३ वरील फवारणी नंतर ६ व्या दिवशी जीए -३ | २० पीपीएम फवारणी |
४ फुलो-या नंतर (मणी सेंटीग नंतर) जीए -३ | ४० पीपीएम + २ पीपीएम सिपीपीयू डीप |
५ मणी आकार ८ ते १० मिमी जीए-३ | ३० पीपीएम + २ पीपीएम सिपीपीयू डीप |
६ वरील डीप नंतर १० दिवसांनी | ६ बीए १०ते १५ पीपीएम +अमिनोअसिड |
७ वरील डीप नंतर १५ दिवसांनी | ६ बीए १०ते १५ पीपीएम + सिविड |
फोरल्कोरफेनुरोरान (सीपीयु ) चा उपयोग:
निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन वाढीमध्ये सीपीयु या संजीवकाचा उपयोग केला जातो.सीपीयू हे संजीवक कायनेटीन या गटातील असून त्याचा मुख्य उद्देश पेशी विभाजन आणि पेशीची वाढ होण्यास होतो.मण्यांचा व्यास ३ मिमी ते ४ मीमी असतांना दीड ते दोन पीपीएम सीपीपीयू + ४० पीपीएम जीए -३ द्रावणात बुडवणी (डीप) करावी. त्यानंतर मण्यांचा व्यास ८ ते १० मिमी झाला असतांना ३० पीपीएम जीए + २ पीपीएम सिपीपीयू बुडवणी करावी.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा