द्राक्ष पिकाचा हंगाम मार्च अखेर संपुष्टात येतो.पुन्हा नवीन हंगामाच्या कामांची एप्रिल पासुन सुरुवात होते.एप्रिल छाटणीस खरड छाटणी असं ही संबोधतात.द्राक्ष पिकाचा दॄष्टीने हि छाटणी अत्यंत महत्वाची असते.कारण भविष्यात येणारा माल याच छाटणीत तयार होतो. म्हणुन हि छाटणी अत्यंत महत्वाची असते.
द्राक्ष माल काढणीनंतर १५ ते२५ दिवस वेलींना विश्रांती दिल्यानंतर योग्य मशागत करुन तसेच बोदावर वेलीच्या दोन्ही बाजुने २ ते ३ इंच चर घेउन एकरी दोन ट्रक सुकेशेणखत टाकावे, शेणखतावर २०० ते २५० किलो सुपरफॉसस्फेट दानेदार स्वरुपात टाकावे.मातीआड करुन बागेस भरपुर पाणी द्यावे.असे केल्याने द्राक्षाची सुप्त अवस्थेतील मुळी पुन्हा चालु होते. व आठ ते दहा दिवसांत कार्यरथ होते.वापसा येताच छाटणी करावी.छाटणी करतांना शक्यतो दोन डोळे राखुन छाटणी करावी.खते व पाणी व व्यवस्थापन करत असतांनाच १८-४६ किंवा २०-२०-० एकरी दोन गोणी तसेच जनरल मायक्रोन्युटीयन्ट्य़स स्फुरदयुक्त खतानंतर आठ ते दहा दिवसांनी द्यावे.
जमिनीच्या प्रतवारीनुसार पाण्याचे नियोजन करावे. मुरमाड जमिनीतील बागेस तीन दिवसाच्या अंतराने २ ते २II तास ड्रिपने पाणी द्यावे,यांमुळे योग्य वापसा टिकवून राहतो आणि चांगली कॅनोपी मिळण्यास मदत होते.छाटणी नंतर २५ ते ३० दिवसांनी १९-१९-१९ वॉटर सोल्युबल फर्टीलाझर एक गोणी चार वेळेस करुन ३ ते५ दिवसांच्या अंतराने द्यावी.युरीयाची मात्रा देउ नये कारण १८-४६ मधील आधिक १९-१९-१९ मधील नत्र पुरेसे होईल.यामुळे काडी एक सारखी होण्यास मदत होईल.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा