खाली दिलेल्या रिकाम्या जागेत तुमचा ई-मेल ऍड्रेस देऊन subscribe वर क्लिक केल्यास nashikgreps.com वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखांची नोंद तुम्हाला तुमच्या inbox मध्ये मिळेल.
Delivered by FeedBurner

द्राक्ष वेलीचे पोषण


Gapevine Nutrion  
द्राक्ष वेलीच्या पोषणावर द्राक्षाची गुणवता आणि उत्पादन अवलंबून असते म्हणून शेतकरी अनेक रासायनिक खतांचा,जैविक आणि जीवाणू  खतांचा उपयोग करतात,त्याच बरोबर द्राक्षवेलीला खत देण्याच्या पद्धतीमधे सुरुवातीला नत्र,फुगवणीच्या काळामध्ये स्फुरद आणि शेवटी द्राक्षतयार होण्याच्या वेळेस पोटॅश यापद्धतीने खतांच्या मात्रा दिल्या जातात आणि ही खते देत असतांना डोळ्यासमोर गुणवत्तायुक्त उत्पादन उदिष्ट ठेवूनच दिले जातात.त्यात द्राक्ष पिकाची गरज,जमिनीत उपलब्ध असलेली खते त्याच बरोबर वेलीतील स्टोरेज या गोष्टीकडे फारसे लक्ष दिले जात नाही.केवळ खतांच्या असंतुलीत वापराने अनेक रोग किडी त्याच बरोबर विकृतीचा द्राक्ष उत्पादन घेत असतांना सामना करावा लागतो.केवळ अन्न्द्रव्यातील एकाच घटकामुळे वेलीचे पोषण होईल असे नाही,तर एक रासायनिक घटकांवर त्याचा विपरीत परिणाम होतो याकडे देखील लक्ष देणे शेतक-यांना गरजेचे आहे.
     जसे नत्राचा अति वापर झाल्यास पोटॅश,बोरॉन आणि कॉपर यांचा अपटेक कमी होवू शकतो.पालाशच्या (potash) अतिवापराने वेलीतील बोरॉन कमी पडते.मॅग्नेशियमच्या अनावश्यक वापरने पोटॅशचा आपटेक थांबतो. कॉपरच्या अति वापराने मॅगेनिज,लोह आणि जस्त यांच्या कमतरता येऊ शकतात.स्फुरदाच्या अति वापरामुळे जस्त,पालाश ,कॅल्शियम आणि लोह यांच्या कमतरता येऊ शकतात, त्याच बरोबर  कॅल्शियमच्या वापरामुळे पालाशमॅग्नेशियम,जस्त,लोह,बोरॉन,स्फुरद आणि नत्र यांच्या कमतरता येऊ शकतात.या अन्न्द्र्व्यातील परस्पर विरोधीपनामुळे केवळ एक अन्नद्रव्ये जमिनीतून देऊन देखील दुस-या अन्नद्रव्याची कमतरता भासू शकते.म्हणूनच सर्व प्रकारची अन्नद्रव्ये जमिनीतून देऊन देखील वेलीमध्ये अनेक कमतरता दिसून येतात.त्याच बरोबर नत्राच्या वापरामुळे मॅग्नेशियम उपलब्ध होते,मॅग्नेशियमच्या वापरामुळे स्फुरद उपलब्ध होते,पालाशच्या वापरामुळे लोह मॅगेनिज उपलब्ध होते तर गंधकाच्या वापरामुळे नत्र, पालाशमॅगेनिज,मॅग्नेशियम आणि कॉपर उपलब्ध होते.
   नियमित द्राक्ष उत्पादन घेतांना चार ते पाच वेळा उत्पादन घेतल्यानंतर किमान किमान पंधरा ते वीस टक्के अन्नद्रव्यांचा गॅप अढळून येतो.पिकाची गरज, जमिनीत उपलब्ध असणारे अन्नद्रव्ये त्याच बरोबर वेलीने पोषकासाठी वापरलेली अन्नद्रव्ये यातील फरकामुळे उत्पादनात,गुणवत्तेत परिणाम आढळुन येतात.
  जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्ये व त्यांचे स्रोत -  
    जवळपास वेलीच्या गरजेच्या ५०% इतके नत्र हवेमार्फत व जमिनीत अनेक बॅक्टेरिया,बुरशी उपलब्ध करून देतात.त्याचबरोबर इतर अन्नद्रव्ये देखील रिसायकलिंग जमिनीमध्ये सूक्ष्म जीव करतात म्हणूनच कोणतेही अन्नद्रव्ये न देता देखील तणांचे पोषण उत्तम होते.जमिनीतील अ‍ॅझोटोबॅक्टर,रायझोबियम, अ‍ॅसोटोबॅक्टर आणि अझोस्पिलीयम या जीवाणूंमुळे नत्राचे मातीत स्थिरीकरण होते.व मुक्त स्वरूपात नत्र पिकास  दिला जातो.त्याचबरोबर बॅसिलीसच्या प्रजाती तसेच मायकोराझा यांच्यामुळे स्फुरदाचे विघटन होऊन पिकास  उपलब्ध करून दिले जाते.तर थायोबॅसिलीसमुळे  पिकास सल्फर(गंधक)उपलब्ध होते.त्याच बरोबर अनेक प्रकारचे ह्युमिकअ‍ॅसिड, ऑरगॅनिकअ‍ॅसिडअ‍ॅटींबायोटिक्स हे जीवाणू जमिनीत चयापचनाद्वारे सोडतात व त्याचा पपेन्ट प्रमोटर म्हणून पिकास फायदा होतो.पिकाच्या मुळीचा जोम वाढतो,मुळीजवळील हवा खेळती राहते.त्याचबरोबर हानिकारक बुरशी,बॅक्टेरिया यांच्या वाढीऎवजी  पिक पोषक जीवाणुंची संख्या बागेत वाढ्ते म्हणुन बायोफर्टीलाझर आणि रासायनिक खते यांच्या संतुलित वापरामुळे द्राक्षवेलीचे पोषण उत्तम होऊ शकते.केवळ रासायनिक खतांनमुळे उत्तम दर्जाचे द्राक्ष तयार होऊ शकत नाही.त्याचबरोबर केवळ जीवाणूंच्या  वापराने उत्पादन क्षमता वाढू शकत नाही हे देखील शेतक-यांनी समजावून घेणे गरजेचे आहे.
   द्राक्ष वेलीच्या ऑक्टोबर छाटणीपूर्व काळात जीवाणू खते अ‍ॅझोटोबॅक्टर, फॉस्फोबॅक्टर,यांचा किमान प्रतीएकर १ किलो या प्रमाणात वापर करावा.तसेच रासायनिक खतांच्या वापरानंतर किमान एक ह्प्ताने रासायनिक खतांच्या संतुलित मात्रा बागेस द्याव्यात.जीवाणू खतांचा वापर जमिनीतून करतांना जमिनीत भरपूर ओल असतांना जमिनीवर फवारणी केल्यास उत्तम, तसेच जीवाणूंच्या वाढीसाठी जून ते नोव्हेंबर हा काळ उत्तम असतो.म्हणूनच अर्ली छाटणीमध्ये कमीत कमी खतामध्ये देखील चांगला दर्जा मिळू शकतो.नंतर थंडीमध्ये आणि उन्हाळ्यात त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रतिकूल परिणाम होतो त्याच बरोबर पाण्याचा देखील कमी अधिक ताण पडतो म्हणून छाटणीपूर्व आणि पिकाच्या सुरुवातीच्या काळामध्ये जीवाणू खतांचा वापर फायदेशीर ठरू शकतो.त्याच बरोबर ट्रायकोडर्मा,पॅसिलोमासीस आणि व्हर्टीसेलीयम यांचा देखील वापर जीवाणू बरोबर करता येतो.
-------------------------------------------------------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

निर्माता/लेखक

द्राक्ष बागायतदरांना अतिशय सोप्या भाषेत द्राक्षनिर्याती सबंधी माहिती पुरविणारे संकेतस्थळ! योग्य लागवड व्यवस्थापन असेल,तसेच निर्यातक्षम माल पिकवला ,तर हे पीक चांगला नफा देऊन जाते.परंतू येत्या काळात लागवड वाढून उपयोग नाही,तर प्रति हेक्टरी नफा कसा वाढेल याकडे लक्ष दिले गेले पाहिजे.

Mobile Phone

Get news on the go Type nashikgreps.com in your mobile phone web browser for free access anytime,from any place. The content is formatted specifically for cell phones and mobile devices.

Creative Commons License
Copyright © 2011 All rights reserved.| privacy-policy |nashikgreps.|RSS Feeds

  © Blogger template Webnolia by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP