खाली दिलेल्या रिकाम्या जागेत तुमचा ई-मेल ऍड्रेस देऊन subscribe वर क्लिक केल्यास nashikgreps.com वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखांची नोंद तुम्हाला तुमच्या inbox मध्ये मिळेल.
Delivered by FeedBurner

नवीन द्राक्षबागेची लागवड

मित्र हो,
नगदि पीक म्हणुन द्राक्ष लागवड करुन भरपुर उत्पादन घेण्याची प्रत्येक द्राक्षबागायतदाराची अपेक्षा असते.द्राक्ष हे पीक बहुवर्षीय असुन,एकदा लागवड केल्यानंतर पिकाचे आयुष्यमान १२-१४ वर्ष असते.तेव्हा लागवडी संदर्भातील    
प्रत्येक गोष्टी बारकाईने समजुन घेणे फारच महत्वाचे असते.
द्राक्ष पीक हे देशातील सर्वात महत्वाचे फळपीक मानले जाते.महाराष्ट्रात प्रामुख्याने नाशिक, सांगली, पुणे व सोलापुर जिल्हात लागवड केली जाते.द्राक्ष पिकाच्या वाढीकरीता , तसेच उत्पादनास पोषक असे वातावरण या विभागात आढळते.द्राक्ष हे पीक बहुवर्षीय असल्याने त्याच्या लागवडीसंबंधी सर्व बाबींची सविस्तर माहिती असणे आवश्यक आहे.
आवश्यक घटक
माती : द्राक्ष हे पीक जरी कोणत्याही प्रकारच्या जमिनीमध्ये शक्य होत असले तरी हलकी व मध्यम प्रकारची जमीन ,जेथे पाण्याचा निचरा चांगला होतो अशा प्रकारच्या  जमिनीत द्राक्ष वेलीची वाढ चांगली होते. फळाची प्रतसुध्दा अशा जमिनीत चांगली अनुभवास येते.
तापमान : द्राक्ष या पीकाची शाकीय वाढ व्यवस्थीत होण्यासाठी उष्ण व कोरडे वातावरण बागेत असणे गरजेचे असते.त्याच प्रमाणे फळाच्या वाढीकरीता सुध्दा अशाच वातावरणाची आवश्यकता असते.
पाउस : आधिक पावसाच्या वातावरणात द्राक्षबाग लागवड हानीकारक ठरु शकते, कारण घडनिर्मीती होण्याकरीता कोरडे वातावरण आवश्यक असते.त्याच बरोबर फळ छाटणीनंतर फुलोरा अवस्थेत पाउस असल्यास अनेक रोगांचा प्रादुर्भाव  वेलीवर होउन उत्पादन पुर्णपणे घटते.
द्राक्ष जातीची निवड: हिरव्या द्राक्षांमध्ये थॉमसन सीडलेस,तास-ए-गणेश, सोनाका, मानिक चमन या जाती फायदेशीर ठरतात , तर रंगीत जातींमध्ये शरद सिडलेस, प्लेम सिडलेस, नानासाहेब पर्पल व रेड ग्लोबसारख्या द्राक्ष जातींचा समावेश आहे.
लागवड :  द्राक्ष लागवड  करतांना कालावधी महत्वाचा असतो.खुटावर कलम करण्या आगोदर त्या रोपांची मुळे जमीनीत पसरुन त्यांचा विकास होउन कलम करण्यासाठी खुंटरोपांची जाडी सात ते आठ मि.मी जाडीची काडी आवश्यक असते. यासाठी जवळपास सहा-सात महिने कालावधी निघुन जातो.तेव्हा लागवड हि साधारणता डिसेंबर ते जानेवारी महिन्यात करणे गरजेचे असते. जमिनीचा प्रकार यावर लागवडीचे अंतर अवलंबुन असते.हलक्या जमिनीत ९ बाय ६ ,९ बाय ५, तर भारी जमीनीत १० बाय ६ पुरेसे होते.
लागवडीची दिशा : द्राक्ष लागवड करतांना दिशा ठरवणे हा फारच महत्वाचा मुद्दा आहे. निर्यातक्षम प्रतीची  द्राक्ष तयार करण्यासाठी घड एक सारख्या हिरव्या रंगाचा आवश्यक असतो.द्राक्ष वेलीची कॅनोपी जरी कमी-जास्त असली तरी दुपारपर्यंतचा सुर्यप्रकाश  व  दुपारनंतर  वेलीच्या विशिष्ट भागावर मिळणारा सुर्यप्रकाश हा एकसारख्या  हिरव्या रंगाचे द्राक्षघड ठेवण्या करीता आवश्यक ठरतो.थोडक्यात  वाय किंवा टि पध्दतीची बाग उत्तर- दक्षिण ठेवल्यास हि वळण पध्दत उपयोगी ठरते. तर बावर ( मंडप) या पध्द्तीच्या बागेची दिशा पुर्व- पश्चिम ठेवणे आश्यक असते. याचे कारण आसे मांडव पध्दतीत कॅनोपी पसरट असते.प्रत्येक घड हा कॅनोपीच्या खाली असतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

निर्माता/लेखक

द्राक्ष बागायतदरांना अतिशय सोप्या भाषेत द्राक्षनिर्याती सबंधी माहिती पुरविणारे संकेतस्थळ! योग्य लागवड व्यवस्थापन असेल,तसेच निर्यातक्षम माल पिकवला ,तर हे पीक चांगला नफा देऊन जाते.परंतू येत्या काळात लागवड वाढून उपयोग नाही,तर प्रति हेक्टरी नफा कसा वाढेल याकडे लक्ष दिले गेले पाहिजे.

Mobile Phone

Get news on the go Type nashikgreps.com in your mobile phone web browser for free access anytime,from any place. The content is formatted specifically for cell phones and mobile devices.

Creative Commons License
Copyright © 2011 All rights reserved.| privacy-policy |nashikgreps.|RSS Feeds

  © Blogger template Webnolia by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP