’रि-कट ’घेतल्या नंतर वातावरणातील तापमानाचा पुरेपुर उपयोग घेउन डोळे फुटण्याची आवस्था सुरु होते.जर री-कटपुर्वी कलम केलेल्या सात ते आठ डोळावरुन पानगळ करुन घेतल्यास डोळे लवकर फुटतात.
दिवसाचे कमाल तापमान वाढत असतांना म्हणजेच १५ फेब्रुवारी च्या दरम्यान जर री-कट घेतल्यास वाढत्या तापमानाचा उपयोग करुन मे-जुन महिन्या पर्यंत चांगल्या प्रकारे ओलांडे तयार होऊन काडी तयार होते.अशा बागेत काडीमध्ये फलधारणा होउन घडनिर्मीती चांगल्या प्रकारे होते.
बागेतील व्यवस्थापन :
रि-कट घेण्याची जागा : कलम केलेल्या जोडा नंतर सात ते आठ डोळावर रि-कट घेउन हायड्रोजन सायनामाईड ३० ते ३५ मि.ली प्रती लिटर प्रमाणात रि-कट घेतलेल्या दोन-तीन डोळयांना चोळावे.
नविन फूट निघणे : रि-कट नंतर नविन फुटी निघायला सुरुवात होते.अशा वेळी उडद्या किडी सरंक्षण करावे. निघालेल्या फुटी मधुन सरळ सशक्त जोमदार अशा दोन फुटी निवडाव्या त्यानंतर पुन्हा जोमदार फुटी पैकी एक फुट निवडावी व दुस-या फुटीचा पाच-सहा पानावर शेंडा मारावा.फुट पुर्णपणे काढू नये कारण काडीवर नविन फुट बांधतेवेळी कुठ्ली हि समस्या निर्माण होऊ शकते.
खत व्यवस्थापन : बागेत नविन निघायला सुरवात झाली, की वाढीचा जोम चांगला असणे फार महत्वाचे असते या साठी योग्य प्रमाणात नत्राचा ह्प्ता द्यावा.त्यानंतर स्फुरद व पालाश यांच्या मात्रा द्याव्या. त्याच प्रमाणे सुक्ष्म अन्नद्रव्ये योग्य प्रमाणात द्यावे




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा