निर्माता / लेखक
मी दत्तात्रय आवारे
उद्योग- कृषी
व्यवसाय- निर्यातक्षम द्राक्षशेती
स्थान-
नाशिक, महाराष्ट्र, भारत.
नमस्कार!
थोडक्यात माझ्या विषयी........
द्राक्षबागायतदार मित्रांनो,मी नाशिक जिल्हातील एक तरुण द्राक्षबागायतदार.द्राक्षबागे संदर्भातले माझे काही अनुभव मी माझ्या या संकेतस्थळ द्वारे आपल्या समोर मांडणारआहे.या संकेतस्थळाचा, आपणास द्राक्षशेती करतांना निश्चीतच मदत होईल.यशस्वी द्राक्ष उत्पादक होतांना द्राक्ष पिकाचा बारकाईने अभ्यास केला तर हे पीक चांगला नफा देउन जाते.
यशस्वी द्राक्ष उत्पादक होण्यासाठी चांगले व्यवस्थापन, बाजाराचे नियोजन, पिकासंबधीचा सतत अभ्यास व संशोधन शेती करण्याची प्रबळ इच्छा या गोष्टी ज्या शेतक-याकडे असतील तो शेतकरी कधीच कर्जबाजारी होणार नाही.द्राक्ष शेती करणे हा केवळ पारंपारीक शेती करण्याचा विषय नाही. अभ्यास, प्रचंड मेहनत, दक्षता घेवून ही शेती करण्याची गरज आहे. बदलते हवामान , पीक परिस्थीती, तातडीने करावयाची कामे याबाबद प्रचंड दक्ष असावे लागते.
शेतीतील काही महत्वाचे घटक असे - १) पीक व्यवस्थापन
२) विक्री व्यवस्था
३) पिकासंबधी सतत अभ्यास
४) ग्राहकाच्या आवडी-निवडी नुसार माल तयार करणे.
या संकेतस्थळाचा उद्देश आसा की द्राक्षशेतीत निर्यातक्षम द्राक्ष तयार करतांना येणा-या अडचणी मग तो निसर्ग असो त्यावर मात कशी करता येईल.या संबधी आपणास निश्चीत उपयोग होईल.हे संकेतस्थळ मी स्वत: दिवसभर द्राक्षशेतीत कष्ट करुन फावल्या वेळात तयार केले.या आगोदर आपण माझे ब्लॉग लिखाण वाचले असेलच,आनेकांच्या प्रतिक्रीयेला मान देउन द्राक्ष शेती विषयी हे पहिलेच मराठीतील संकेतस्थळ (वेबसाइट) आपल्या हाती देतांना आनंद होत आहे.तुम्हाला या वेबसाईट बद्दल काही बदल सुचवावेसे वाटल्यास जरुर सुचवा तुमच्या सुचनांचे स्वागतच केले जाईल. आपणास द्राक्षशेतीतील कुठ्ल्याही प्रकारची समस्या असल्यास अगदि निसंकोच खाली दिलेल्या विरोप पत्त्यावर (e-mail) निरोप पाठवा.
धन्यवाद,
नाशिक ग्रेप्स टिम.
E-mail- nashikgreps@gmail.com





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा